सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेने दिले जीवदान

Date:

सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेमुळे जीवदान

रुग्णवाहिकेतच उपचार सुरू; डॉ. पंजाबराव चव्हाण यांच्या तत्परतेमुळे नर्मदा महाले यांचे प्राण वाचले

मोखाडा : शेतात गवत कापताना विषारी सापाने दंश झालेल्या ६० वर्षीय नर्मदा महादू महाले यांना ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या वेळेवर मिळालेल्या सेवेमुळे जीवदान मिळाले. मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पासोडीपाडा येथे ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

नर्मदा महाले या शेतात गवत कापत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

याच वेळी आसे येथील ‘१०८’ रुग्णवाहिका दुसऱ्या एका गंभीर रुग्णाला घेऊन गेल्यामुळे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मोखाडा येथील ‘१०८’ रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. पंजाबराव चव्हाण यांनी आसे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.

नर्मदा महाले यांची प्रकृती पाहून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेत हलविण्यात आले. रुग्णालयाकडे नेत असतानाच डॉ. चव्हाण यांनी रुग्णवाहिकेत आवश्यक उपचार सुरू ठेवले. त्यामुळे महाले यांची प्रकृती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.

यानंतर त्यांना मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. निरंजन सापटे यांनी पुढील उपचार केले. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आले.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होणे आणि प्रवासादरम्यानच उपचार सुरू राहणे, हे नर्मदा महाले यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. त्यांच्या कुटुंबीयांनी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले. नर्मदा महाले यांचा मुलगा मधुकर महाले यांनीही पथकाच्या तत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भुसावळच्या आगीच्या दुर्घटनेत ‘१०८’ची मदत ठरली मोलाची

केमिकल फॅक्टरीतील धोकादायक परिस्थितीत चालक मनोज भोईटे आणि डॉ....

कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघाली मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या...

वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप

कोल्ड फायरची विद्युत रोषणाई अन पुष्पवृष्टीने मिरवणूक ठरली लक्षवेधक पुणे...