गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Date:

मेट्रो सेवेचा वापर करण्याचे ना. पाटील यांचे आवाहन

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी मेट्रोतून प्रवास केला.तसेच, सर्वांनी मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहनही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी ०८. ३५ वाजता वनाज मेट्रो स्टेशन येथून मेट्रोने प्रवास सुरू केला. ९.०० वाजता ते महात्मा फुले मंडई (बेलबाग चौक) येथे पोहोचले. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोतील प्रवाशांशी संवाद साधला.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता होत असून, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. स्वतः मेट्रोतून प्रवास करत त्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा संदेश दिला.

दरम्यान, यापूर्वीही चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी होत रिक्षातून प्रवास केला होता. यावेळी त्यांनी सपत्नीक पुण्यातील मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे दर्शन घेतले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हाइट हाऊसमध्ये शी जिनपिंग यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांचे स्टेट डिनर

मेलानिया ट्रम्प यांच्या देखरेखीखाली खास मेन्यू; तिळाची सी-बास, जंगली...

गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये सिलिंडर लीक होऊन आग:पाच कर्मचारी जखमी

पुणे- साळवे गार्डनसमोरील गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळी...

सीओईपी प्रवेश प्रकरणात ‘कोळी महादेव’ जातदावा अवैध

धुळे जात पडताळणी समितीचा निर्णय; प्रमाणपत्र रद्द व पुढील...

पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज!

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जन मिरवणुकीने...