गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये सिलिंडर लीक होऊन आग:पाच कर्मचारी जखमी

Date:

पुणे- साळवे गार्डनसमोरील गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील पाच कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नमो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानंतर किचनमध्ये आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या घटनेत आतिक खान (वय ३४) हा सुमारे ३० टक्के भाजला असून त्याच्या दोन्ही हात-पायांना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. संजय कुमार चौरसिया (१९) याच्या चेहऱ्याला सुमारे १० टक्के भाजले आहे. शंकर सरदार (२६) याच्या हाताला व चेहऱ्याला किरकोळ भाजले असून तो सुमारे १० टक्के भाजला आहे. रंजीत रॉय (२२) याच्या उजव्या हाताला मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. छाया लक्ष्मण कांबळे (५५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

सर्व जखमी हे हॉटेलमधील कर्मचारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिलिंडरमधून गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आणि आग लागण्यामागील कारण काय, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

याबाबत अग्निशामक दलाने सांगितले की, गुरवारी सायंकाळी सात वाजता कोंढवा बुद्रुक, हॉटेल गोकुळ येथील सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दूर केला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात नेले अशी प्राथमिक माहिती आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

मेट्रो सेवेचा वापर करण्याचे ना. पाटील यांचे आवाहन पुणे :...

सीओईपी प्रवेश प्रकरणात ‘कोळी महादेव’ जातदावा अवैध

धुळे जात पडताळणी समितीचा निर्णय; प्रमाणपत्र रद्द व पुढील...

पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज!

पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता आज गणेश विसर्जन मिरवणुकीने...

निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत द इंडियन एक्स्प्रेसने...