मोदी-शहांचीही चौकशी होणार; ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावं :- राहुल गांधी

Date:

राहुल गांधी म्हणाले की, जर संविधान नष्ट झाले तर कायदे संपतील आणि संस्था अर्थहीन होतील.

नवी दिल्ली – बुधवारी (23 सप्टेंबर) ‘द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टनंतर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज, गुरुवारी (24 सप्टेंबर) एक विशेष पत्रकार परिषद घेतली.यावेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, ते गेल्या तीन वर्षांपासून पुराव्यासह ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यानंतर निर्माण झालेल्या दबावानंतर आता दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगातील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

ज्ञानेश कुमारांनी देशाविरोधात काम केलं असून त्यांनी आता माफीचा साक्षीदार व्हावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधींनी फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंतच्या पत्रकार परिषदा आणि कार्यक्रमांचाही उल्लेख केला, ज्यात त्यांनी कथित ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित केला होता.

या पत्रकार परिषदेतील आरोपांवर निवडणूक आयोगाची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये.

अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, अँटी-इन्कम्बन्सी अर्थात सत्ताविरोधी लाट ही कोणत्याही लोकशाही देशात ठराविक काळानंतर येतच असते. अगदी इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही निवडणुका हरल्या. पण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ‘सत्ताविरोधी लाट’ असतानाही, निवडणुकीतून ती गायब झाल्यासारखी वाटते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना ते म्हणाले की, “अशी स्थिती याआधी कधीही भारतात आली नव्हती. निवडणूक आयुक्त पदावर असलेले ज्ञानेश कुमार हे एक प्यादे आहेत. लोकशाहीला बरबाद करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. लोकशाही यंत्रणा बरबाद झाली आहे, हे भारतातील प्रत्येकाला वाटतंय. ज्ञानेश कुमारांनी देशाविरोधात काम केलं असून त्यांनी आता माफीचा साक्षीदार व्हावं. एक काळ असा नक्की येईल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही चौकशी केली जाईल.”

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात काय म्हटलं होतं?

इंडियन एक्सप्रेसचं हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारच्या कामकाजावर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत ’10 महिन्यांत 14 वेळा’ आक्षेप नोंदवले.

या रिपोर्टनुसार, “निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी दाखल केलेल्या या आक्षेपांमध्ये, स्वतःला अंधारात ठेवण्यापासून ते नवीन मतदारांची नोंद करणं आणि नावं वगळणं, तसेच ‘अनधिकृत, बेकायदेशीर’ कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापर्यंतच्या बाबींचा समावेश होता.”

विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

राहुल गांधींनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, “हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुकांनंतर नेहमीच सरकार बदललं, पण अचानक निवडणुकीतील ‘सत्ताविरोधी लाट’ कुठेतरी गायब होताना दिसली.

ते म्हणाले की, “याचं कारण असं आहे की, मी एका राजकीय कुटुंबातून आलो आहे आणि 50 वर्षांहून अधिक काळ राजकीय कुटुंबातच घालवला आहे. लोकशाही वातावरणात काम करणारा कोणताही राजकीय नेता अशाप्रकारे विधान करू शकत नाही की, आम्ही 2030 पर्यंत सत्ते राहू, 50 वर्षे राहू वगैरे. कारण भारतात ‘सत्ताविरोधी लाट’ नावाची एक मूलभूत शक्ती आहे, जी कोणत्याही सरकारला खूप लवकर विरोध करू लागते आणि कुणालाही सोडत नाही.”

“अगदी इंदिरा गांधींनी देखील बांगलादेश युद्ध जिंकलं. त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या आणि मग अचानक, एक-दोन वर्षांतच, त्यांना प्रचंड सत्ताविरोधी लाटेचा आणि अफाट दबावाचा सामना करावा लागला.”राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गौतम अदानी यांच्यासह सात जणांचे फोटो दाखवत, हेच लोक लोकशाही नष्ट करत असल्याचा दावा केला.

“अनेक नेत्यांच्या बाबतीत एकापाठोपाठ एक नेमकं हेच घडलेलं आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडलंय, प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत घडलंय, पण काही कारणास्तव नरेंद्र मोदींच्या बाबतीत हे कधीच घडत नाही. अमित शाह यांच्या बाबतीत घडत नाही, भाजपच्या बाबतीत घडत नाही,” असं म्हणत त्यांनी आपला मुद्दा मांडला.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, “भारतातील सर्वात मोठी राजकीय शक्ती अर्थात सत्ताविरोधी लाट कुठे नाहीशी झाली आहे? आम्ही याचं उत्तर शोधत होतो आणि अखेरीस आम्हाला ते मिळालं. प्रत्येक भारतीय नागरिकाचं मत हा आपल्या देशाचा पाया आहे. मतांना निवडणूक आयोगाकडून संरक्षण दिलं जातं. त्यांना त्यांची शक्ती संविधानाकडून मिळते. जर मतंच नष्ट झाली, तर आपलं संविधान नष्ट होईल.”

“त्यामध्ये कोणतीही शक्ती उरणार नाही, त्याचं कोणतंही कार्य राहणार नाही. जर संविधान नष्ट झालं, तर आपले कायदे संपतील आणि संस्था अर्थहीन होतील. हा आपल्या मतावर हल्ला आहे. हा प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. आम्ही सातत्यानं सांगत आलो आहोत की मतांमध्ये काहीतरी समस्या आहे. ते सुरक्षित ठेवणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे.”पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गौतम अदानी यांच्यासह सात जणांचे फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हेच लोक लोकशाही नष्ट करत आहेत आणि भारतीय निवडणुकांमध्ये 100 टक्के गैरप्रकार होत आहेत.

“दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मी हे प्रश्न वारंवार उपस्थित केले आहेत, पण आता दोन निवडणूक आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञानेश कुमार यांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केली होती. आता, दोन निवडणूक आयुक्त म्हणत आहेत की आपल्या मतदान प्रणालीला होणाऱ्या नुकसानीसाठी ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत. मतचोरीनंतर कायद्याची चोरी होते आणि मग संस्थेची चोरी होते. जर मत चोरले गेले असेल आणि संसदेत बसलेल्या खासदाराने कोणताही कायदा केला, तर ते बेकायदेशीर आहे.”राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या तीन वर्षांतील एक घटनाक्रम दाखवला, ज्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगातील अनियमितता आणि ‘मतचोरी’चा मुद्दा कधी उपस्थित केला होता, हे सांगितलं.

राहुल गांधी असंही म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांच्या निवडीच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला विरोध दर्शवला होता, पण त्यांनी ज्ञानेश कुमार यांचीच निवड केली.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगावरील दबाव आता वाढत असून आम्हाला आतून सातत्यानं माहिती मिळत आहे. येत्या तीन-चार महिन्याच्या काळात आणखी स्फोटक अशी माहिती नक्कीच बाहेर येणार आहे, तुम्ही पाहात रहा.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक आयोगाकडून ‘मॅच फिक्सिंग’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत द इंडियन एक्स्प्रेसने...

आरोपींची पोलिस वाहनाच्या बोनेटवरून काढली धिंड: 18 पोलिसांवर गुन्हा

सीआयडीच्या उपअधीक्षकांच्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन गुन्हे; वरिष्ठ...

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महुआ मोइत्रांची दिल्ली पोलिसांत तक्रार; FIR नोंदवण्याची मागणी

मतदार याद्यांतील बदलांबाबत गंभीर आरोप; विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांना...

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; प्रा. दुल्ला यांना तत्काळ अटक करण्याची युवक काँग्रेसची मागणी

राहुल गांधींचा साहिलच्या पालकांशी संवाद; निष्पक्ष चौकशीची मागणी करत...