विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली

Date:

पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघाचे आवाहन
पुणे : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत शिस्त, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघ, महाराष्ट्राच्या पुणे शहर कार्यकारिणीने पथकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मिरवणुकीत टोल वादन न करण्यासह प्रत्येक वादकाकडे ओळखपत्र, ५० ढोल व १६ ताशांसह १५० ते २०० वादकांचा सहभाग आणि चार रांगांमध्ये ढोलवादन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कुमठेकर व टिळक रस्त्यावर पथकांना मार्ग उपलब्ध करून देणे, लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक बंदोबस्त, तसेच गुलाल-भंडारा, वायूयुक्त सिलेंडर आणि इलेक्ट्रिक आतषबाजी (कोल्ड फायर) यावर निर्बंध घालण्याची मागणी महासंघाने केली आहे. डेकोरेशनच्या रथांना मनाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक यांना निवेदन दिले आहे.

नियमावलीनुसार प्रत्येक वादकाकडे संबंधित पथकाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. विसर्जन मिरवणुकीत ५० ढोल,१६ ताशे, ध्वज आणि झांज यांचा समावेश राहणार असून, १५० ते २०० वादक सहभागी होतील. ढोलवादन चार रांगांमध्ये करण्यात येणार असून, टोल वादन केले जाणार नाही.

लक्ष्मी रस्ता ओलांडण्यासाठी कुंटे चौक तसेच गुरूजी तालीम मंडळ येथील मार्गाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून समाधान चौकाकडे पथकांना प्रवेश दिला जाणार नाही. मिरवणुकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना गर्दीतून मार्गस्थ होण्यासाठी पथकांनी सहकार्य करावे, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

मिरवणुकीत पथकांनी पोलीस प्रशासन आणि पत्रकारांना सहकार्य करावे, तसेच वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. पथकांकडून तसेच गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त डेकोरेशनच्या रथांना मनाई करावी, तसेच मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गुलाल आणि भंडाऱ्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी महासंघा च्या पुणे शहर कार्यकारिणी ने केली आहे. गुलाल-भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वायूयुक्त सिलेंडर तसेच इलेक्ट्रिक आतषबाजी  यावरही निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

लक्ष्मी रस्त्यावर येणाऱ्या मिरवणुकांसाठी योग्य वेळापत्रक आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त, केळकर रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगला मनाई, तसेच कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर पथकांना मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी महासंघाने केली आहे. शगुन चौक आणि विजय टॉकीज चौक येथे पथकांना मार्गस्थ होण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी गेली अनेक वर्षे महासंघाचे अनुभवी प्रतिनिधी उपलब्ध असतात. यंदाही हे प्रतिनिधी मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे महासंघाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे यांनी सांगितले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठचा गणपती ‘श्री वक्रतुंड’ रथातून निघणार; दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभाग

१३४ व्या वर्षाची सांगता मिरवणूक थाटामाटात; प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीवर...

कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष पुणे : अखिल...

रशियाकडून तेल खरेदी अचानक थांबवणे शक्य नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्ट भूमिका

१४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा गरजांना प्राधान्य; “जगाच्या कोणत्याही भागातून...

न्यूयॉर्कमध्ये अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा; ट्रम्प म्हणाले, “चर्चा चांगली झाली, लवकरच पुन्हा बैठक”

कतारची मध्यस्थी; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर अटी...