कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक

Date:

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी निघणार आहे. यंदा मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघणार आहे. सुमारे ३२ फूट उंचीच्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला आहे. सुमारे ३२ फूट उंच असलेल्या या रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, रथ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे.  

ऐश्वर्याचे प्रतीक हत्ती, शौर्याचे प्रतीक सिंह प्रतिकृती रथावर असणार आहे. गणपतीच्या मागे तेजाचे प्रतीक सूर्य साकारण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद आणि वाद्य पथकांचा सहभाग असणार आहे. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे न्यू गंधर्व बँड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणूकीत होणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठचा गणपती ‘श्री वक्रतुंड’ रथातून निघणार; दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभाग

१३४ व्या वर्षाची सांगता मिरवणूक थाटामाटात; प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीवर...

विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली

पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे ढोल ताशा फेडरेशन राज्यव्यापी महासंघाचे...

रशियाकडून तेल खरेदी अचानक थांबवणे शक्य नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्ट भूमिका

१४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा गरजांना प्राधान्य; “जगाच्या कोणत्याही भागातून...

न्यूयॉर्कमध्ये अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा; ट्रम्प म्हणाले, “चर्चा चांगली झाली, लवकरच पुन्हा बैठक”

कतारची मध्यस्थी; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर अटी...