बाळासाहेब विखे-पाटलांची नात निला विखे-पाटील स्वीडनच्या संसदेत; ‘स्टॉकहोम सिटी’मधून विजयी

Date:

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या; बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झाली आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या ग्रीन पार्टीकडून ‘सिटी ऑफ स्टॉकहोम’ मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत आता त्या खासदार म्हणून काम करणार आहेत. स्वीडिश संसदेच्या अधिकृत नोंदीतही निला विखे-पाटील यांची ग्रीन पार्टीच्या खासदार म्हणून नोंद करण्यात आली आहे.

निवडीनंतर पीटीआयशी बोलताना निला यांनी संसदेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मतदानाचा अधिकार नसलेल्या घटकांचाही आवाज संसदेत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील, तसेच बालकल्याण आणि पर्यावरण हे आपल्या कामाचे प्रमुख विषय असतील, असे त्यांनी सांगितले.

निला विखे-पाटील या महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध विखे-पाटील कुटुंबातील आहेत. त्या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या पणती, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या नात आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुतणी आहेत.

आजोबा बाळासाहेब विखे-पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना निला यांनी त्यांना अभिमान वाटेल असे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. वयाच्या १५व्या वर्षी आजोबांनी आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला दिला होता, तसेच त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ते नियमित संपर्कात असत, असे त्यांनी सांगितले.

स्वीडनमध्ये जन्म, बालपणाचा काही काळ अहमदनगरमध्ये

निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. मात्र त्यांच्या बालपणातील काही वर्षे अहमदनगरमध्ये गेली. त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून Gothenburg School of Businessमधून पदवी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी माद्रिदमधील Universidad Complutense येथेही एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

निला यांना स्वीडनच्या राजकीय व्यवस्थेतील दीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले असून वित्त, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि गृहनिर्माणाशी संबंधित विषयांची जबाबदारी सांभाळली होती. त्या स्टॉकहोम महानगरपालिकेच्या सिटी कौन्सिलवरही निवडून आल्या होत्या.

ग्रीन पार्टीमध्येही त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. स्वीडिश सार्वजनिक प्रसारमाध्यम SVTच्या २०२६ निवडणूक प्रोफाइलमध्येही त्यांची ग्रीन पार्टीच्या उमेदवार म्हणून नोंद असून पर्यावरणीय शाश्वतता, जैवविविधता आणि हवामानाशी संबंधित मुद्द्यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे.

स्वीडनमध्ये १७६ विरुद्ध १७३ अशी जागावाटप

२०२६ च्या स्वीडिश संसदीय निवडणुकीत Social Democrats, Green Party, Left Party आणि Centre Party या चार पक्षांच्या गटाला एकूण १७६ जागा, तर Moderates, Sweden Democrats, Christian Democrats आणि Liberals या गटाला १७३ जागा मिळाल्या आहेत. ग्रीन पार्टीला स्वतंत्रपणे २२ जागा मिळाल्या आहेत. स्वीडनच्या संसदेत एकूण ३४९ जागा आहेत.

महाराष्ट्राशी नाते असलेल्या निला विखे-पाटील यांचा स्वीडनच्या राष्ट्रीय संसदेत प्रवेश झाल्यामुळे विखे-पाटील कुटुंबाच्या राजकीय-सामाजिक प्रवासात आणखी एक आंतरराष्ट्रीय अध्याय जोडला गेला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मानाच्या गणपतींच्या चरणी नतमस्तक होत महापौर मंजुषा नागपुरे यांची पुणेकरांसाठी मंगलकामना

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात...

महापौर बंगल्यातील श्रींची आरती ईशान्य भारतातील आसामच्या युवक-युवतीं च्या हस्ते

पुणे, दि. १९ : पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती...

हडपसर परिसरातून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता; काळेपडळ पोलिसांकडून शोध सुरू

९ सप्टेंबरपासून अनमोल विश्वकर्माचा ठावठिकाणा नाही; अज्ञात व्यक्तीने फूस...

कदमवाकवस्तीतील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; लोणी काळभोर पोलिसांकडून शोध सुरू

आकांक्षा विकास शर्मा १६ सप्टेंबरपासून बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून...