पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुण्याच्या मानाच्या गणपतींचे विधिवत दर्शन घेत महापूजा व मंगलआरती केली. पुण्याचे ग्रामदैवत व मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती आणि मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती यांचे दर्शन घेऊन त्यांनी श्री गणरायाचे पूजन केले. तसेच पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेतील ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या श्रीमंत शारदा गजानन गणपतीचेही दर्शन घेऊन आरती व पूजन केले.
पुण्याच्या गणेशोत्सवाला लाभलेली शतकोत्तर परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा वारसा जपत महापौर मंजुषा नागपुरे यांनी विविध गणेश मंडळांना भेट देत उत्सव , सामाजिक उपक्रम तसेच व्यवस्थेचीही माहिती घेतली. श्री गणरायाच्या चरणी पुणे शहरातील नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांतता आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी संबंधित गणेशोत्सव मंडळांचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक नागरिक उपस्थित हो

