‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

Date:

परंपरा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परदेशातील उत्सवाचा अनोखा संगम

पुणे, दि. १८ : सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे डिजिटल सांस्कृतिक संग्रह पोर्टल असलेल्या Bappa.org वर आजच्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव कथांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील नव्या घरातील पहिला गणेशोत्सव, कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती उत्सव, घरच्या घरी साकारलेली मातीची मूर्ती, व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांचा उत्सव आणि विसर्जनाच्या मातीतून वृक्षसंवर्धन अशा प्रेरणादायी उपक्रमांचा समावेश आहे.

राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.

संजय मंगलाराम यांच्या पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच गणरायाचे स्वागत केले. कुटुंबातील दोन लहान मुलींनी दैनंदिन पूजा आणि आरतीचे नेतृत्व केले. नव्या पिढीकडे परंपरेचा वारसा सोपविणाऱ्या या कौटुंबिक गणेशोत्सवाची निवड झाली आहे.

गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा
कोकणातील गुहागर परिसरात महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेती व गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या या शतकानुशतकांच्या प्रथेची निवड करण्यात आली आहे.

निकिता जे. पांचाळ यांची घरच्या घरी मातीची मूर्ती
निकिता जे. पांचाळ यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची बाजारातील मूर्ती आणि कृत्रिम रंगांचा वापर टाळला. त्यांनी कच्च्या मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती घडवून स्वतः रंगकाम केले. पारंपरिक मातीकलेचे जतन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा त्यांचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

व्हिएतनाममध्ये विद्यार्थ्यांनी जपली गणेशोत्सवाची परंपरा
महाराष्ट्रापासून दूर व्हिएतनाममध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी केली. परदेशात उत्सवासाठी आवश्यक साहित्य मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी स्वतः ताजे मोदक तयार केले आणि मित्रांना उत्सवात सहभागी करून घेतले. ईश्वर मनोहर बोरसे यांनी नोंदविलेली ही कथा परदेशातही भारतीय संस्कृती आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपणारी ठरली आहे.

विसर्जनाच्या मातीतून ३० हून अधिक वृक्षांचे संवर्धन
पराग नारायण शेठ गुजराथी यांच्या कुटुंबात गेल्या ६५ वर्षांपासून एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. मागील सहा वर्षांपासून कुटुंब मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घराच्या गच्चीवरच विसर्जन करते. विसर्जनानंतरच्या मातीत रोपे लावून ती पाच फुटांपेक्षा अधिक वाढेपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. त्यानंतर ही रोपे स्थानिक नदीकाठ आणि डोंगर परिसरात लावली जातात. या माध्यमातून आतापर्यंत ३० हून अधिक वृक्ष वाढविण्यात आले आहेत.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
राज्यातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी महाराष्ट्राच्या अधिकृत सांस्कृतिक डिजिटल संग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी Bappa.org या संकेतस्थळावर गणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून परंपरा, देखावा किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी. माहिती यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर शासनाचे अधिकृत डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र देण्यात येईल.

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पर्यावरणपूरक कलाकृती आणि समाजोपयोगी उपक्रम असलेल्या नोंदींची दैनंदिन पाच कथांसाठी निवड करून त्यांना शासनाच्या विविध माध्यमांवर प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कदमवाकवस्तीतील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; लोणी काळभोर पोलिसांकडून शोध सुरू

आकांक्षा विकास शर्मा १६ सप्टेंबरपासून बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून...

गंगा नेब्युला सोसायटीमध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा

‘गीता सार’ आणि ‘काकोरी ट्रेन ॲक्शन’च्या नाट्यरूपांतराने वेधले लक्ष;...

यूपीआय एमडीआर: 15 ऑक्टोबरपूर्वी तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे

यूपीआय एमडीआर: ग्राहक आणि व्यापाऱ्यांना काय माहित असणे आवश्यक...