पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह

Date:

हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड भाजपच्या वतीने एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात दिवे प्रज्वलित करून दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी संपूर्ण मेट्रो स्थानक परिसर उजळून निघाला होता. यावेळी “मोदीजी, आप देश का विकास करो, हम आपके साथ हैं!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस आणि सेवा पर्व संयोजक सुशील मेंगडे, भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘सेवा पर्व’ साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशभरात उभारलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या परिसरात कार्यकर्त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भाजप कोथरुड मंडलाच्या वतीने एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मेट्रो स्थानकाचा संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला.

यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना गती मिळाली असून, विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले आहे. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, मेट्रो प्रवासी देखील या आनंदोत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिंहगड रोड हिंगणे ते सहकारनगर सातारा रोड वाहतुकीसाठी बोगद्याच्या पर्यायी मार्गाची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून पूर्वपाहणी

नागरिकांना सुरक्षित व सुलभ दळणवळणाची सुविधा देण्यासाठी महापौरांचा पुढाकार पुणे...

गणेशोत्सव मंडळांमध्ये पोहोचून महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

विमाननगर, चंदननगर, वडगाव शेरी व खराडी परिसरातील विविध मंडळांना...

निठारी प्रकरणातील सुरेंद्र कोलीचा हरिद्वारमध्ये मृत्यू; प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय

१३ प्रकरणांत झाली होती फाशीची शिक्षा; १९ वर्षांच्या कारावासानंतर...

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग गणेशोत्सव हा केवळ...