गणेशोत्सव मंडळांमध्ये पोहोचून महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

Date:

विमाननगर, चंदननगर, वडगाव शेरी व खराडी परिसरातील विविध मंडळांना सदिच्छा भेट

पुणे-
पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी महापौर मंजुषा नागपुरे यांनी विमाननगर, चंदननगर,
वडगाव शेरी आणि खराडी येरवडा परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाची आरती व मनोभावे दर्शन करून पुणेकरांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली.

या भेटीदरम्यान महापौर मंजुषा नागपुरे यांनी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली. उत्सव काळातील स्वच्छता, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था याबाबतही चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रबोधन, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देणाऱ्या मंडळांच्या कार्याचे महापौरांनी कौतुक केले.

पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीची समृद्ध परंपरा जपणारा उत्सव आहे. मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक प्रबोधन आणि जनकल्याणाच्या उपक्रमांना प्राधान्य देत पुण्याच्या गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा अधिक समृद्ध करावी, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिंहगड रोड हिंगणे ते सहकारनगर सातारा रोड वाहतुकीसाठी बोगद्याच्या पर्यायी मार्गाची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून पूर्वपाहणी

नागरिकांना सुरक्षित व सुलभ दळणवळणाची सुविधा देण्यासाठी महापौरांचा पुढाकार पुणे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह

हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर ना. चंद्रकांतदादा पाटील यांची...

निठारी प्रकरणातील सुरेंद्र कोलीचा हरिद्वारमध्ये मृत्यू; प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय

१३ प्रकरणांत झाली होती फाशीची शिक्षा; १९ वर्षांच्या कारावासानंतर...

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग

सायबर फसवणूक ; सावधगिरी हाच सुरक्षिततेचा मार्ग गणेशोत्सव हा केवळ...