सिंहगड रोड हिंगणे ते सहकारनगर सातारा रोड वाहतुकीसाठी बोगद्याच्या पर्यायी मार्गाची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून पूर्वपाहणी

Date:

नागरिकांना सुरक्षित व सुलभ दळणवळणाची सुविधा देण्यासाठी महापौरांचा पुढाकार

पुणे

हिंगणे खुर्द सिंहगड रोड ते सहकारनगर सातारा रोड परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहतुकीसाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौर मंजुषा नागपुरे यांनी हिंगणे-खोराड वस्ती परिसरात डोंगरातून बोगदा (Tunnel) निर्माण करण्याच्या प्रस्तावाची आज पूर्वपाहणी केली. या प्रस्तावित बोगद्यामुळे हिंगणे ते सहकारनगर तसेच तळजाई परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासोबतच नागरिकांचा वेळ व प्रवासाचे अंतर कमी करण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या व्यवहार्यता, तांत्रिक बाबी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, हा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराचा महत्त्वाचा भाग आहे. याच अनुषंगाने हिंगणे-खोराड वस्ती येथील रस्ता रुंदीकरण तसेच नाल्यावर कल्व्हर्ट बांधून तो बंदिस्त करण्याच्या प्रस्तावित कामांचीही पाहणी करण्यात आली. परिसरातील वाहतूक कोंडी, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेविका ज्योती गोसावी, पुणे महानगरपालिका प्रकल्प अधिकारी गोजारे तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला सुरक्षेसाठी कडक कायद्यांसोबत जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट अनिवार्य : डॉ. नीलम गोऱ्हे

दिल्ली प्रकरणी तातडीच्या न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह

हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर ना. चंद्रकांतदादा पाटील यांची...

गणेशोत्सव मंडळांमध्ये पोहोचून महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतले गणरायाचे दर्शन

विमाननगर, चंदननगर, वडगाव शेरी व खराडी परिसरातील विविध मंडळांना...

निठारी प्रकरणातील सुरेंद्र कोलीचा हरिद्वारमध्ये मृत्यू; प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय

१३ प्रकरणांत झाली होती फाशीची शिक्षा; १९ वर्षांच्या कारावासानंतर...