नवीन कामगार कायद्याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

Date:

पुणे, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि Aajivika Bureau यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे तसेच संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग एस. पी. नार्वेकर उपस्थित होत्या.

यावेळी एस. पी. नार्वेकर यांनी नवीन कामगार संहितेतील तरतुदी, कामगारांचे हक्क व कायदेशीर संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. सचिव रेवती आर. देशपांडे यांनी कामगारांसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेविषयक सेवा, मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमास कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक करणे व विधी सेवा सुविधांपर्यंत त्यांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनगणना २०२७ साठी ४० बाबींवर माहिती संकलित करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश

पुणे, : भारताची जनगणना २०२७ च्या अनुषंगाने विहित कुटुंब...

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी केंद्राचा ६० टक्के शिष्यवृत्ती हिस्सा महाविद्यालयात जमा करावा

रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत महाविद्यालयाचा हिस्सा...