अभिनव लॉ कॉलेजमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम

Date:

विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, कायद्याचे पालन आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत मार्गदर्शन

पुणे : प्रतिनिधी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे होत्या.

कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवंती आर. देशपांडे तसेच संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग डी. डी. पाटील उपस्थित होत्या.

यावेळी डी. डी. पाटील यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमली पदार्थांपासून दूर राहून समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रेवंती आर. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कायद्याचे पालन करून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या जनजागृती कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी केंद्राचा ६० टक्के शिष्यवृत्ती हिस्सा महाविद्यालयात जमा करावा

रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत महाविद्यालयाचा हिस्सा...

परराज्य शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र...

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर...

समाविष्ट ३२ गावांच्या मिळकतकर नोंदींच्या सखोल ऑडिटचा प्रस्ताव

दरवर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त; GISसह...