डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला न्यायालयाचा दणका; मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड मालक दोषी

Date:

पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन; खडक पोलिसांनी २४ तासांत दोषारोपपत्र दाखल केले

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांनी जाहीर केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड सिस्टीम मालकाला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई करत २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

२६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित जुलूस आणि मिरवणुकांमध्ये डीजे साऊंड सिस्टीम, लेझर लाईट आणि फटाक्यांचा वापर न करण्याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले होते. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच साऊंड चालक-मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल मदिना यंग बॉईज, ५४ बीपी, लोहियानगर या मंडळाने मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टीमचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जावेद मजीद शेख आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटर-मालक प्रकाश कृष्णात असवले यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी यापूर्वी संबंधितांना मर्यादेपेक्षा जास्त आवाजात साऊंड सिस्टीम वाजवू नये, याबाबत लेखी सूचना दिल्या होत्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ नुसार नोटीसही बजावण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही आदेशाचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात गाणी वाजवून नागरिकांना त्रास दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि २९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिघांविरुद्ध कारवाई करून शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ६ मध्ये २४ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

न्यायालयाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष वाहिद मणियार, उपाध्यक्ष जावेद शेख आणि साऊंड सिस्टीम मालक प्रकाश असवले यांना संबंधित कलमांनुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली आहे.पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये मात्र शिक्षेचे नेमके स्वरूप किंवा दंडाची रक्कम नमूद केलेली नाही.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दलित साहित्य ही समाजाची गरज ‘उर्गेंन आर्ट फेस्टिवल’ मध्ये ज्येष्ठ साहित्यिकांची भावना

करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर आयोजित उर्गेंन आर्ट...

उत्सवांची दहशत: “मी जिवंत असेन तर मोर्चात जाईन”; हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची ठाम भूमिका

“मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा महत्त्वाचा”; ध्वनीप्रदूषणाला ‘सॉफ्ट...

विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ रविवारी पुणे महापालिकेवर ‘डीजेमुक्ती’ मोर्चा

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांचे सोशल मीडियातून पुणेकरांना आवाहन;...