१६ महिन्यांच्या चिमुकलीच्या आयुष्यात पुन्हा भरणार ‘आवाज’

Date:

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अॅड. तनिषा पाटील यांचे विशेष सहकार्य

पुणे : आई-वडिलांच्या कुशीत नुकतेच उमललेले १६ महिन्यांचे चिमुकले आयुष्य… डोळ्यांत जग पाहण्याची निरागसता, मात्र कानांपर्यंत जगाचा आवाज पोहोचत नव्हता. गंभीर श्रवणदोषामुळे या चिमुकलीच्या भवितव्यावर अंधाराची छाया निर्माण झाली होती. मात्र, माणुसकीच्या भावनेतून पुढे आलेल्या मदतीच्या हातामुळे तिच्या आयुष्यात आता आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

कोथरुड मधील केळेवाडी येथील रहिवासी मेघा बोडके यांनी १६ महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय तपासण्या आणि अहवालांच्या सखोल अभ्यासातून या बालिकेला गंभीर श्रवणदोष असल्याचे निदान झाले. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांनी कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

मात्र, या शस्त्रक्रियेसाठी अपेक्षित असलेला तब्बल १० लाख रुपयांचा खर्च बोडके कुटुंबासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरला. आपल्या चिमुकलीने एक दिवस आईचा आवाज ऐकावा, तिच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, इतर मुलांप्रमाणे शिकावे आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बोडके कुटुंबाची धडपड सुरू होती.

बोडके कुटुंबाची ही परिस्थिती सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका श्रीमती स्मिता पाटील यांनी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दादांनी लोकसहभागातून या चिमुकलीच्या उपचारासाठी मदत उभी करण्याचा निर्णय घेतला. रक्षाबंधनानिमित्त आयोजित सखी-सुखदा फाऊंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांनी या बालिकेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले.

चंद्रकांतदादांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन तसेच अॅड. तनिषा समीर पाटील यांनी बालिकेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या सामूहिक प्रयत्नांतून तिच्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

आज ही आर्थिक मदत बालिकेच्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात आली. या मदतीमागे केवळ आर्थिक हातभार नसून, एका चिमुकलीला आवाजांच्या जगात घेऊन जाण्याची, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्याची आणि तिच्या भविष्याला नवी दिशा देण्याची संवेदनशील भावना आहे.

आज ती कदाचित शब्द ऐकू शकत नसेल… पण तिच्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. हीच माणुसकीची सर्वात सुंदर जाणीव आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अॅड. तनिषा पाटील यांच्या मदतीमुळे तिच्यावर आवश्यक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया होऊन तिला ऐकण्याची, बोलण्याची, शिकण्याची आणि आत्मविश्वासाने उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धायरीतील ३० मीटर रस्त्यासाठी ६० कोटींचे भूसंपादन

लोकमत प्रेस ते सावित्री गार्डनदरम्यान ५६ मिळकती ताब्यात घेणार;...

प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची जागा देणार

स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराचीही व्यवस्था ;श्रीनाथ भिमाले पुणे : पुणे...

झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’

महापालिकेचा निर्णय; मासिक देयकाच्या १० ऐवजी आठ टक्के रक्कम...