मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध

Date:

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेविरोधात दादर येथे आंदोलन

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट २०२६ :

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जातीयवादी मानसिकतेविरोधात आपला संताप व्यक्त केला.

यावेळी झीनत शबरीन म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला असताना जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात युवक काँग्रेस सातत्याने लढा देत राहील.

भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा अधिकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जातीय भेदभाव आणि मनुवादी विचारसरणीला कोणतेही स्थान नाही. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समतेसाठी युवा काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार झीनत शबरीन यांनी यावेळी व्यक्त केला.

या आंदोलनात मुंबई युवा काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबई युवा काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रदेश, जिल्हा आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीत ६२.१३ लाख मतदार; २८.६६ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

२१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध; १३.३२ लाख प्रकरणांवर...

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश

पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक...