गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

Date:

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने २७ विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १४ अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरुवात होणार असून २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात तसेच विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ,मुळशी, शिरूर, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा आणि हवेली आदी तालुक्यांसह पुणे शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियुक्त अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करतील. नियुक्त अधिकाऱ्यांपैकी एखादे पद रिक्त असल्यास संबंधित तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नजीकच्या नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून अतिरिक्त कार्यभार देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश

पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक...

डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर

पुणे, दि.३१: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर,...

‘DJच्या वादात पडू नका; सांस्कृतिक गणेशोत्सव कसा असतो हे पुणेकरांनी दाखवून द्यावे’ – मुख्यमंत्री फडणवीस

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यातील बैठकीत विरोधकांवर हल्लाबोल; ‘लाल संविधानाच्या...