शहरांचे बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी नवे खुले व्यासपीठ; मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये शुभारंभ.

Date:

मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६
विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत जाती-धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य देत राजकारणाची दिशा बदलली गेली, पक्ष फोडण्याचे राजकारण झाले, निवडणुकांमध्ये पैशांचा वाढता वापर झाला आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. हे गलिच्छ राजकारण आणि शहरांचे बकाल होत चाललेले रूप बदलण्याची गरज आहे. शहरांचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास व्हावा, असे ज्यांना वाटते, अशा सर्वांसाठी ‘शहर परिवर्तन गट’ हे खुले व्यासपीठ आहे. ही केवळ काँग्रेसची मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि ‘शहर परिवर्तन गटा’चे अध्यक्ष सचिन सावंत यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालय टिळक भवन येथे आज ‘शहर परिवर्तन गटाचे’ उद्घाटन करण्यात आले. यावेळी AICC सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे, अॅड. संदेश कोंडविलकर, मा. दिनेश कांबळे, प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के यांच्यासह MMR विभागातील विविध शहरांचे काँग्रेस अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जनसंघटनांचे प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सचिन सावंत म्हणाले की, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्याचा मोठा ताण नागरी पायाभूत सुविधांवर पडत आहे. नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, वाहतूक कोंडीमुक्त प्रवास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दर्जेदार आरोग्य सुविधा, शिक्षणाच्या सोयी आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन मिळणे ही शहर विकासाची प्राथमिक गरज आहे. मात्र, सत्ताधारी या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जाती-धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण करून जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहेत.
शहरातील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य, सुरक्षित आणि दर्जेदार व्हावे, शहरांचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि नागरिकांच्या प्रश्नांना शासन-प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ असावे, या भूमिकेतून काँग्रेसने ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन केला आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शहरी नियोजन तज्ज्ञ, व्यावसायिक, विद्यार्थी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शहर परिवर्तन गटाचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. आजच्या वेगाने बदलणाऱ्या शहरी भारताकडेही त्याच दूरदृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करूया, असेही सचिन सावंत म्हणाले.
‘शहर परिवर्तन गट’ हे केवळ काँग्रेसचे व्यासपीठ न राहता शहराच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुले व्यासपीठ असेल. काँग्रेसने शहरी भागातील सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः Gen Z साठी या उपक्रमाची दारे खुली केली आहेत. शहराच्या प्रश्नांवर काम करणारे तज्ज्ञ, व्यावसायिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध जनसंघटनांच्या प्रतिनिधींनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
शहर बदलायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘शहर परिवर्तन’ ही केवळ राजकीय मोहीम न राहता नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ झाली पाहिजे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर येथे आज ‘शहर परिवर्तन गटाचा’ शुभारंभ करण्यात आला असून आगामी काळात राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘निरोगी सखी राहील सुखी’ महापौर महिला आरोग्य अभियानाचा दुसरा टप्पा सुरू

महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा...

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय:राज्यात आजपासून सुटे तेल विक्रीवर पूर्णपणे बंदी

गतवर्षी तब्बल ५ कोटी ३१ लाखांचे निकृष्ट तेल जप्त मुंबई-...

सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

नवी दिल्ली येथे दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण...