राज्य सरकारकडून डिजिटल मिडियाचा वापर :वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद

Date:

मुंबईमहाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि खर्चाच्या बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांत तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) गुरुवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. या निर्णयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आणि त्यांच्या शासकीय निवासस्थानाला वगळण्यात आले आहे. दरम्यान, छापील वृत्तपत्रांबाबतचा हा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा वृत्तपत्र विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केला.

इनसाइड स्टोरी: मंत्र्यांचा वृत्तपत्रांवर वर्षाला २२ लाख खर्च

सामान्य प्रशासन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मंत्र्यांच्या छापील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांवर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी २२ लाख रुपयांचा खर्च होत होता. छापील वृत्तपत्रांच्या तुलनेत ई-पेपर, न्यूज पोर्टलचे सबस्क्रिप्शन स्वस्त असल्याने सरकारची आर्थिक बचत होणार असल्याचा दावा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गतवर्षापेक्षा खडकवासला धरणसाखळीत २.२८ टीएमसी अधिक पाणीसाठा (९५.२२ %),एकूण २७.७६ टीएमसी पाणी

मुठा नदीतील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेक्सपर्यंत वाढवणार पुणे, दि....

महापालिकेच्या खाबुगीरीच्या कारभाराविरोधात शिंदेसेना आक्रमक:शिवसैनिकांचे मुख्यालयावर आंदोलन..

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या गलथान, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना पुणे...

गेल्यावर्षीपेक्षा १.७९ टीएमसी अधिक पाणीसाठा; खडकवासला धरणसाखळी ९४.४६ टक्के भरली

चार धरणांत २७.५३ टीएमसी पाणी; खडकवासल्यातून सायंकाळी ७.३० वाजता...