पुणे शहराच्या अग्निसुरक्षेला मोठा दिलासा; फायर हायड्रंट प्रणाली उभारणीचा नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर

Date:

पुणे :पुणे शहरातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत, पुणे महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. सुहास विजय टिंगरे यांनी मांडलेला “शहरातील दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये आधुनिक फायर हायड्रंट प्रणाली उभारणे तसेच विद्यमान फायर हायड्रंट कार्यान्वित करण्याचा ठराव” मंजूर करण्यात आला.
पुणे शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, अरुंद रस्ते, जुन्या पेठा आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी तातडीने पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर शहरभर सक्षम आणि आधुनिक फायर हायड्रंट नेटवर्क उभारण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण ठराव सादर करण्यात आला होता.
मंजूर झालेल्या ठरावानुसार शहरातील सर्व विद्यमान फायर हायड्रंटचे सर्वेक्षण करून त्यांची कार्यस्थिती तपासली जाणार असून, बंद अवस्थेतील हायड्रंट तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच झोपडपट्ट्या, दाट लोकवस्ती, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे आणि इतर उच्च जोखमीच्या भागांमध्ये नवीन फायर हायड्रंट उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
याशिवाय सर्व फायर हायड्रंटचे GIS आधारित डिजिटल मॅपिंग, नियमित तपासणी, देखभाल व सुरक्षा लेखापरीक्षण, पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्यात प्रभावी समन्वय, तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावरही भर देण्यात येणार आहे.
यावेळी नगरसेवक सुहास विजय टिंगरे म्हणाले,
“नागरिकांची सुरक्षितता ही पुणे महानगरपालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग विझविण्याची सक्षम यंत्रणा आधीपासून उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. महासभेने या महत्त्वपूर्ण ठरावाला मंजुरी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार. आता प्रशासनाने या निर्णयाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करून पुणे शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.”
या निर्णयामुळे पुणे शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचा प्रतिसाद अधिक जलद आणि प्रभावी होऊन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या महासभेने घेतलेला हा निर्णय शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्य सरकारकडून डिजिटल मिडियाचा वापर :वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद

मुंबई- महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि...

गतवर्षापेक्षा खडकवासला धरणसाखळीत २.२८ टीएमसी अधिक पाणीसाठा (९५.२२ %),एकूण २७.७६ टीएमसी पाणी

मुठा नदीतील विसर्ग १६ हजार २४७ क्युसेक्सपर्यंत वाढवणार पुणे, दि....

महापालिकेच्या खाबुगीरीच्या कारभाराविरोधात शिंदेसेना आक्रमक:शिवसैनिकांचे मुख्यालयावर आंदोलन..

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या गलथान, निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना पुणे...

गेल्यावर्षीपेक्षा १.७९ टीएमसी अधिक पाणीसाठा; खडकवासला धरणसाखळी ९४.४६ टक्के भरली

चार धरणांत २७.५३ टीएमसी पाणी; खडकवासल्यातून सायंकाळी ७.३० वाजता...