सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांचे जोरदार आंदोलन

Date:

पुणे-लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने पोलिसांच्या बळाचा वापर करून ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे उचलून नेले, त्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘संविधान रक्षक वकील फोरम’च्या वतीने आज जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर (गेट नंबर ४) येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे न्यायालय परिसर दणाणून गेला होता.
​आंदोलक वकिलांनी केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात आणि ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या” आणि “सोनम वांगचुक आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है” अशा तीव्र घोषणा दिल्या.

​संविधान रक्षक वकील फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. मोहन वाडेकर यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले,
​”सरकारने सोनम वांगचुक यांच्या २० दिवसांच्या प्राणांतिक उपोषणाकडे आणि ढासळत्या तब्येतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सोनम वांगचुक आणि त्यांच्यासोबतच्या विद्यार्थ्यांनी ‘नीट’ पेपरफुटी विरोधात जे आंदोलन केले होते, त्यात केंद्र सरकारला उपोषणकर्त्या सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांचे बळी घ्यायचे होते का? शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून ते जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत हे सरकार अतिशय असंवेदनशील आणि क्रूर पद्धतीने आंदोलनकर्त्यांशी वागत आहे. केंद्र सरकारचे हे वागणे पूर्णपणे असंविधानिक सं आणि घटनात्मक मूल्यांची पायमल्ली करणारे असून, आम्ही संविधान रक्षक फोरमचे वकील याचा तीव्र निषेध करतो.”

​या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. शाहिद अख्तर, अ‍ॅड. नीलिमा वर्तक, अ‍ॅड. एकनाथ सुगावकर, अ‍ॅड. लक्ष्मण राणे, एडवोकेट किरण कदम ,एडवोकेट फैय्याज शेख, एडवोकेट नाथा शिंगाडे एडवोकेट श्रीकांत अगस्ते आणि महेश देशमुख यांनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या असंवेदनशील कृतीचा जाहीर निषेध केला.

​या आंदोलनादरम्यान ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यामुळे आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या २३ निष्पाप विद्यार्थ्यांना संविधान रक्षक वकील फोरमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. शारदा वाडेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अ‍ॅड. निखिल गडकर यांनी मानले. या आंदोलनाला शिवाजीनगर न्यायालयातील तरुण आणि ज्येष्ठ वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन संपल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना संविधान रक्षक वकील फोरम पुणे यांचे तर्फे निवेदन ज्येष्ठविधीज्ञ एडवोकेट नाथा शिंगाडे एडवोकेट तौफिक शेख एडवोकेट कुंभारकर एडवोकेट अमित पाडळे एडवोकेट श्वेता कुंभारकर यांनी दिले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांचे ५६७ कोटी वाचवा,ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढा

अरविंद तुकाराम शिंदे यांचा स्थायी समितीत ठराव; रामचंद्र ऊर्फ...

महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या 'महापौर Gen Next Civic Fellows'...

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार मुंबई, दि. २० :...

हडपसर परिसरात पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे, दि. २० जुलै : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत...