कोथरूडमध्ये मोबाइल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आठ जण ताब्यात

Date:

अंतर्गत वादातून हत्या करण्याची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा; दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश

पुणे, दि. १७ जुलै : कर्वे रोड परिसरातील एका मोबाइल व्यावसायिकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक क्रमांक एकने आठ जणांना ताब्यात घेतले आहे. व्यावसायिकासोबत असलेल्या अंतर्गत वादातून त्याची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी कर्वे रोड, कोथरूड परिसरात मोबाइल व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकावर काही हल्लेखोरांनी लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव तसेच शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सिद्धेश नितीन धुमाळ हा घोरपडे उद्यान परिसरात लपून बसल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सिद्धेश धुमाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अन्य साथीदारांची माहिती समोर आली.

त्यानंतर पोलिसांनी नागेश उर्फ लाडू राजू माणिके आणि राज तुषार धुमाळ यांच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या सर्वांचा व्यावसायिकावरील हल्ल्यात सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत या हल्ल्यामागील कथित कटही उघडकीस आला. व्यावसायिकासोबत झालेल्या अंतर्गत वादातून प्रसाद सुभाष मारणे, आदित्य अश्विनीकुमार डाके आणि मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे यांनी हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले पाच जण आणि कथितरित्या सुपारी देणारे तीन जण अशा एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक क्रमांक एक आणि गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...