पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती:’सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ उपक्रमातून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन, तरुणाईने घेतली शपथ

Date:

पुणे-पुणे शहर पोलिसांनी ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम गुरुवारी नेहरू स्टेडियम परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, राजेश बनसोडे, तसेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला.

सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी प्रास्ताविकात युवकांना व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी सक्रिय भूमिका बजावून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि एएनटीएफचे हिम्मत जाधव यांनी अमली पदार्थांचे वाढते संकट, त्याचे सामाजिक परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

शिक्षणाधिकारी कोरकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच योग्य मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश दिला, तर टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चांदे यांनी करिअर, शिस्त आणि चांगल्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित एका लघुपटाचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वतः व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला.

पुणे शहर पोलिसांनी अशा उपक्रमांद्वारे युवकांमध्ये जनजागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...