मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी तुडुंब गर्दी: कर्मचाऱ्यांसह नागरिकांचीही ससेहोलपट

Date:

जिल्हाधिकारी यांनी अनेकदा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना या कामासाठी मदत करावी असे आवाहन केले पण या आवाहनास कुठे प्रतिसाद लाभलाय असे क्वचितच दिसत होते.जवळ जवळ बहुसंख्या राजकीय कार्यकर्त्यांनी मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाकडे दुलाक्ष केल्याचेच चित्र आज दिसून आले.

पुणे- मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी आज ठीकाठीकानाच्या महापालिकांच्या वास्तूत तसेच काही शाळात नागरिकांना बोलविले गेल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना तुडुंब गर्दीला सामोरे जावे लागले, अगदी दुपारी वडापाव खाता खाता काही ठिकाणी काम करताना कर्मचारी दिसले तर काही बेपार्वाही देखील दिसून आले एकूणच व्यवस्थेमुळे आणि अॅप मधील गोंधळामुळे अनेकांनी वारंवार मतदान केलेलं असताना , मतदार यादीत नाव असताना अॅप मध्ये मात्र ते आढळून येत नसल्याने या टेबल वरून त्या टेबलवर आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणे येणे नागरिकांना करावे लागले आणि भारतातच आपण भारतीय असल्याचे सांगणे पुरावे देणे यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने मतदारांची ससेहोलपट होताना दिसून आली तर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही ससेहोलपट होत होती, शाळेतील शिक्षकांचे तर विद्यार्थी शिक्षणावर लक्षच नव्हते .

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम दि. २० जून २०२६ पासून सुरू असून हा कार्यक्रम प्रभावी व सुरळीतपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित केले आहेत.

मतदारांना पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आवश्यक माहिती, मार्गदर्शन तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे.तर वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती प्राची कचरे, महापालिका सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी ०२०-२५५०६६४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा sirhelpdeskpmc@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर,भोर व मावळ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० तसेच sirhelpdeskrural@gmail.com हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चिंचवड, पिंपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी श्री. सचिन पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ८८८८००६६६६ या क्रमांकावर किंवा sirhelpdeskpcmc@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, माहिती अद्ययावत करणे अथवा इतर बाबींकरिता संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून, त्यासाठी जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच विविध राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज, पुणे येथील प्रत्येकी १५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. मोबाईल अॅप आणि संगणकीय प्रणालीचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांकडून बीएलओंना गणना अर्जांचे वितरण, माहिती संकलन आणि डिजिटल नोंदणीसारख्या तांत्रिक कामात प्रभावी सहाय्य मिळत आहे. विद्यार्थी बीएलओंसोबत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत.

या उपक्रमामुळे मतदार पुनरीक्षण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्यास मदत होत असून, प्रशासन आणि युवक यांच्यातील समन्वयाचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज यांच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व महाविद्यालये व शिक्षण संस्थांनीही या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी बीएलओंना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून तरुणांच्या सहभागातून पुणे जिल्ह्याची मतदार यादी अधिक अचूक व परिपूर्ण तयार करता येईल.

तसेच, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओंना मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदारांच्या सक्रिय सहभागातूनच अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत मतदार यादी तयार होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती सचिन अहिरांना बंगला मिळेना; ‘रायगड’ चव्हाणांकडे, तर ‘पुरंदर’ बनसोडेंना

सामान्य प्रशासन विभागाकडून चर्चगेटमधील फ्लॅट मंजूर; अद्याप स्वीकारला नसल्याची...

बांधकाम परवानगीसाठी ‘एपीआय’ प्रणाली; शिवाजीनगर उड्डाणपूल आणि लोहगाव विमानतळाच्या पर्यायी रस्त्याला गती

बाणेर-कोथरूडमध्ये पायलट प्रकल्प; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मान्यता, लोहगावमधील भूसंपादनासाठी...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करावे

पुणे, दि. १६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास...