महिंद्राच्या चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून आजवर ३० लाख वाहनांची निर्मिती

Date:

महिंद्राची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई 6’ ठरली या टप्प्यातील ३० लाखावी निर्मिती

वेगवान वाढ: अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन केवळ 27 महिन्यांत पूर्ण
मोठ्या प्रमाणावर लवचिक उत्पादन क्षमता: 657 एकरांवर पसरलेल्या एकात्मिक उत्पादन केंद्रात 19 मॉडेल्स आणि 450 हून अधिक प्रकारच्या वाहनांचे उत्पादन
शाश्वततेला प्राधान्य: पाण्याच्या वापरापेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणारा (Water Positive), ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ प्रमाणित आणि 50% पेक्षा अधिक अक्षय ऊर्जेवर कार्यरत उत्पादन प्रकल्प

चाकण, 16 जुलै 2026: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या अत्याधुनिक चाकण उत्पादन प्रकल्पाने एकूण ३० लाख वाहनांच्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असल्याचे आज जाहीर केले. या टप्प्यातील ३० लाखावी निर्मिती म्हणून महिंद्राची सर्वात प्रगत फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई 6’ ही गाडी ठरली आहे. इंटर्नल कम्बशन इंजिन तसेच इलेक्ट्रिक दळणवळण या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीस पाठबळ देत सक्षम अशा भविष्याभिमुख उत्पादन केंद्रामध्ये या प्रकल्पाचे झालेले रूपांतर या टप्प्यातून दिसून येते.

डिसेंबर 2009 मध्ये पहिले वाहन उत्पादन केंद्रातून बाहेर आल्यानंतर, चाकण प्रकल्प महिंद्राच्या दृष्टीने सर्वाधिक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या उत्पादन प्रकल्पांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक वेगाने, केवळ 27 महिन्यांत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन पूर्ण करण्यात या प्रकल्पाने यश मिळवले.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, “चाकण उत्पादन प्रकल्पातून आमच्या 3 दशलक्षाव्या वाहनाचे, म्हणजेच बीई 6 चे उत्पादन पूर्ण होणे हा महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पहिल्या 1 दशलक्ष वाहनांसाठी लागलेल्या 107 महिन्यांच्या तुलनेत अलीकडील 1 दशलक्ष वाहनांचे उत्पादन केवळ 27 महिन्यांत पूर्ण होणे हे आमच्या ग्राहकांचा वाढता विश्वास तसेच आमचे कर्मचारी, भागीदार आणि पुरवठादार यांच्या अतूट बांधिलकीचे प्रतीक आहे. चाकण प्रकल्पात इंडस्ट्री 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), 5G कनेक्टिव्हिटी, प्रगत रोबोटिक्स, डिजिटल ट्रेसेबिलिटी आणि लीन तसेच टीपीएम पद्धतींवर आधारित लवचिक मल्टी-मॉडेल उत्पादन प्रणाली यांचा समन्वय साधण्यात आला आहे. या सर्व क्षमतांमुळे जबाबदार उत्पादन प्रक्रियेलाही चालना देत आम्हाला जागतिक दर्जाची गुणवत्ता, लवचिकता आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता सादर करता येते. भारतासाठी आणि जगासाठी भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याचा आमचा प्रवास सुरू असताना चाकण प्रकल्प आमच्या उत्पादनातील उत्कृष्टतेचा केंद्रबिंदू राहील.”

मोठ्या प्रमाणावर लवचिक उत्पादन क्षमता: एकात्मिक उत्पादन केंद्र

657 एकरांवर पसरलेल्या चाकण उत्पादन प्रकल्पात इंटर्नल कम्बशन इंजिन (अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE)) प्रवासी वाहने, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांसह 19 मॉडेल्स आणि 450 हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते.

बुद्धिमान आणि कुशल उत्पादन व्यवस्था: भविष्याभिमुख परिसंस्था

चाकण उत्पादन प्रकल्पात गुणवत्ता, लवचिकता आणि कार्यक्षमतेतील उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासोबत लीन आणि टोटल प्रॉडक्टिव्ह मेंटेनन्स (TPM) कार्यपद्धतींचा प्रभावी संगम करण्यात आला आहे.

स्मार्ट उत्पादन: इंडस्ट्री 4.0, AI, IoT, 5G कनेक्टिव्हिटी आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत डिजिटल ट्रेसेबिलिटी.
मोठ्या प्रमाणावर स्वयंचलन: सुमारे 1,500 रोबोट्स, बॉडी-शॉपमध्ये 98% पेक्षा अधिक स्वयंचलन, तसेच रोबोटिक पेंटिंग आणि सीलर अॅप्लिकेशन.
अंगभूत गुणवत्ता: 3D घटक स्कॅनिंग, रिअल-टाइम वेल्ड-इंटिग्रिटी मॉनिटरिंग आणि इंटरलॉक्ड “नो फॉल्ट फॉरवर्ड” गुणवत्ता गेटवे.
लवचिक उत्पादन प्रक्रिया: सात मल्टी-मॉडेल असेंब्ली लाईन्स आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी सिंक्रोनाइझ्ड ऑटोनॉमस मोबाइल रोबोट्स.
AI-सक्षम सुरक्षा: वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या (PPE) वापराचे आणि शॉप-फ्लोअरवरील सुरक्षिततेचे प्रत्यक्ष त्या त्या वेळातील निरीक्षण.

शाश्वततेला प्राधान्य: मोठ्या प्रमाणावर जबाबदार उत्पादन

उत्पादन प्रकल्पाच्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी 50% पेक्षा अधिक गरज अक्षय ऊर्जेतून पूर्ण केली जाते तर या प्रकल्पातील इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन 100% अक्षय ऊर्जेवर चालते.
हा प्रकल्प पाण्याच्या वापरापेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणारा (Water Positive) असून वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या समतुल्य 131% पाणी पुन्हा नैसर्गिक पर्यावरणात परत केले जाते. यासाठी दरवर्षी अंदाजे 9.91 लाख किलोलिटर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जाते.
चाकण उत्पादन प्रकल्पाला ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याच्या EP100 वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेनेही तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

जगभरासाठी भारतात निर्मिती: महिंद्राच्या जागतिक विस्ताराला बळ

चाकण उत्पादन प्रकल्पात तयार होणारी जवळपास सर्व वाहन मॉडेल्स महिंद्राच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाला पाठबळ देतात. या प्रकल्पातून दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह विविध जागतिक बाजारपेठांमध्ये वाहनांची निर्यात केली जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...