होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या तैनातीवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Date:

वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जहाज कंपन्या, व्यवस्थापन संस्था आणि RPSL कंपन्यांना आदेश; भारतीय खलाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

नवी दिल्ली | प्रतिनिधी

आखाती प्रदेशातील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पुढील आदेश येईपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची तैनाती करण्यास बंदी घातली आहे. जहाज मालक, जहाज व्यवस्थापन कंपन्या तसेच रिक्रूटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिस लायसन्स (RPSL) धारक कंपन्यांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.

सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, अरबी आखात, होर्मुझ सामुद्रधुनी आणि परिसरातील सागरी मार्गांवर कार्यरत सर्व कंपन्यांनी अत्यंत दक्षता बाळगावी. सागरी सुरक्षा संदर्भातील सर्व सूचना आणि सल्ले नियमितपणे तपासावेत तसेच आंतरराष्ट्रीय जहाज व बंदर सुविधा सुरक्षा (ISPS) संहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

इराण-अमेरिका तणावानंतर होर्मुझ परिसरात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा धोका वाढला आहे. अलीकडील हल्ल्यांमध्ये भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

जहाज वाहतुकीवर परिणाम

सुरक्षा धोक्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजे पाठविणे कमी केले आहे. काही कंपन्या पर्यायी सागरी मार्गांचा वापर करत असून, काही जहाजांनी इराणी सागरी मार्गाचा अवलंब केला आहे.

रॉयटर्सने सागरी डेटा कंपनी केप्लरच्या आकडेवारीच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या सामुद्रधुनीतून १३ जहाजे गेली होती, तर बुधवारी ही संख्या घटून वर आली. विशेष म्हणजे, बुधवारी एकही अतिविशाल कच्चे तेल (VLCC) टँकर किंवा एलएनजी टँकर या मार्गाने गेल्याची नोंद नाही.

भारताबाहेरील भरतीवर आदेश लागू नाही

भारतीय सरकारचा हा आदेश भारतातून भरती होणाऱ्या भारतीय खलाशांपुरता लागू आहे. परदेशी शिपिंग कंपन्यांनी भारताबाहेरून खलाशांची भरती केल्यास त्या भरतीवर हा आदेश थेट लागू होणार नाही.

मध्यपूर्वेतील घडामोडी

दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव कायम असून अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्याचा इराणने दावा केला आहे. तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी कतारला भेट दिली असून, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...