‘अखेर नगरविकास विभागाला सद्बुद्धी’ म्हणाले उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी अन प्रशांत बधे

Date:

‘उशिरा का होईना महाराष्ट्राप्रमाणेच पीएमआरडीएला न्याय’; नव्या याचिकेची गरज संपल्याचा दावा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विशेष नियोजन क्षेत्रातील ११७ गावांमध्ये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगरविकास विभागाचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी स्वागत केले आहे. “अखेर नगरविकास विभागाला सद्बुद्धी सुचली,” अशी प्रतिक्रिया उज्ज्वल केसकर (माजी विरोधी पक्षनेते), सुहास कुलकर्णी (माजी विरोधी पक्षनेते) आणि प्रशांत बधे (माजी नगरसेवक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे वगळता यूडीसीपीआर-२०२० लागू करण्यात आला होता. मात्र, पीएमआरडीए क्षेत्राला त्यापासून वगळण्यात आले होते. पीएमआरडीएने शासनाकडे ठराव करून प्रस्ताव पाठविल्यानंतरही सुमारे सहा महिने निर्णय न झाल्याने याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएमआरडीए क्षेत्रातील केवळ टाऊनशिप आणि स्पेशल टाऊनशिपसाठी यूडीसीपीआर लागू करण्यात आला होता. त्यावेळी हा लाभ संपूर्ण पीएमआरडीए क्षेत्राला मिळावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतरही शासनाने व्यापक निर्णय घेतला नव्हता.

माजी लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धीपत्रकात दावा केला आहे की, नगरविकास विभागाने अखेर पीएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या ११७ गावांमध्ये यूडीसीपीआर लागू करून महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच या क्षेत्रालाही समान न्याय दिला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करत नगरविकास विभागाचे आभार मानण्यात आले आहेत.

दरम्यान, यूडीसीपीआर-२०२० मधील काही तरतुदींविरोधात यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अद्याप प्रलंबित असून, या नियमावलीमुळे भविष्यात अनियंत्रित एफएसआय वाढीस चालना मिळू शकते, अशी भूमिका त्यांनी पुन्हा मांडली आहे. तथापि, पीएमआरडीए क्षेत्रात यूडीसीपीआर लागू करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याची गरज आता उरलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कसबा भूमीत छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक: सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

स्मारकाच्या कामाचा आढावा आणि नियोजित आराखड्याची पाहणीरत्नागिरी, दि. 15...

खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा ५७.८४ टक्क्यांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.७६ टीएमसीची तूट कायम

चारही धरणांत १६.८६ टीएमसी पाणीसाठा; मंगळवारी पावसाचा जोर ओसरला,...

नमस्ते डे’ निमित्त पुणे मनपाकडून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान; विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

आरोग्य तपासणी, सुरक्षा साहित्य, प्रशिक्षण आणि शासकीय योजनांची माहिती;...

कसबा पेठेत महापालिकेची धडक कारवाई; दोन प्रसिद्ध बेकऱ्यांना ₹५० हजारांचा दंड

सॅलेसबरी पार्क परिसरात अस्वच्छता व ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी...