नमस्ते डे’ निमित्त पुणे मनपाकडून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान; विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

Date:

आरोग्य तपासणी, सुरक्षा साहित्य, प्रशिक्षण आणि शासकीय योजनांची माहिती; जनजागृतीलाही प्राधान्य

पुणे, दि. १५ : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत दरवर्षी १४ जुलै हा दिवस ‘नमस्ते डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी ऑडिटोरियम येथे झालेल्या कार्यक्रमात सफाई कर्मचारी, सांडपाणी व सेप्टिक टँक कर्मचारी, नाला सफाई कर्मचारी, एसटीपी/एफएसटीपी कर्मचारी तसेच कचरा वेचक (Waste Pickers) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात सुरक्षा साहित्य (PPE Kits) प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, विविध शासकीय योजनांची माहिती, प्रशिक्षण सत्रे, सुरक्षा प्रात्यक्षिके तसेच आयुष्मान भारत (AB-PMJAY) कार्ड आणि NAMASTE ओळखपत्र वितरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपायुक्त संतोष वारुळे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत उपलब्ध विविध कर्ज व अर्थसहाय्य योजनांचीही माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयांतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई सेवक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा तसेच सुरक्षित व यांत्रिकीकरणावर आधारित स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरण समूहातील पाणीसाठा ५७.८४ टक्क्यांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.७६ टीएमसीची तूट कायम

चारही धरणांत १६.८६ टीएमसी पाणीसाठा; मंगळवारी पावसाचा जोर ओसरला,...

कसबा पेठेत महापालिकेची धडक कारवाई; दोन प्रसिद्ध बेकऱ्यांना ₹५० हजारांचा दंड

सॅलेसबरी पार्क परिसरात अस्वच्छता व ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील २४ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

पुणे, दि. १५: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे...

पुणे महानगर क्षेत्रात ‘यूडीसीपीआर’ लागू; पीएमआरडीए व एमएसआरडीसीच्या ६६८ चौ.कि.मी. क्षेत्राला मोठा दिलासा

११७ गावांसह संपूर्ण पीएमआरडीए कार्यक्षेत्रात एकसमान विकास नियमावली; नियोजनबद्ध...