प्रत्यक्षात पडलेली मते अधिकृत -कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर :७३१९४ आणि भाजपचे हेमंत रासने ६२२४४, आनंद दवे २९६
पुणे-राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.तब्बल २८ वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपाकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी १९९२ च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २००९ मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. सन २००९ ची विधानसभा निवडणूक रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना कडवे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत गिरीश बापट यांना सात हजार मतांनी निसटता विजय मिळाला होता.
लागोपाठ चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद भोगल्याने रासनेंची दमछाक … बालेकिल्ल्याला सुरुंग महापालिकेच्याच पदाधिकाऱ्यांच्या कारभाराने
पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला आहे. पुणे महापालिकेत तब्बल १०० नगरसेवकांचे म्हणजे हत्तीचे बळ घेऊन सत्ता प्राप्त केलेल्या भाजपची आज त्यांचा कित्येक वर्षे बालेकिल्ला मानला जाणारा कसबा राखण्यासाठी झालेली दम छाक पाहूनही त्यामागचे कारण वरिष्ठ नेत्यांना समजत नसेल तर नवलच म्हणावे लागणार आहे. १०० नगरसेवक असताना केवळ मोहोळ आणि रासने यांच्यावर सलग केलेली कृपादृष्टी आणि या दोहोंनी केलेला लॉबी ,आणि भेदभावाचा, पाय खेचाखेची चा कारभार यामुळेच हा बालेकिल्ला ढासळला आहे. केवळ खासदार गिरीश बापट यांना केसरीवाड्यात प्रचारासाठी आणल्याने बापटांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली होती आणि यामुळे धंगेकर यांचे मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले अन्यथा धंगेकर यांचे मताधिक्य आणखी वाढले असते .
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावूनही भाजपने बालेकिल्ला गमावला
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यात हजेरी लावली होती.
अर्ध मंत्रिमंडळ प्रचाराला आलं होतं. मात्र, त्याचा फारसा फायदा हेमंत रासनेंना झाल्याचं पोटनिवडणुकीत दिसलं नाही. तब्बल 30 वर्षांनी भाजपने पारंपारिक मतदारसंघ गमावला आहे.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव झाला. तब्बल 30 वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. कसब्यात कमळ कोमजले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल उधळला.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात लढत झाली. या निवडणुकीसाठी ५०.०६ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातील पोस्टल मतदान मोजण्यात आले. त्यात धंगेकर यांनी मतामध्ये आघाडी घेतली. धंगेकर यांनी मतमोजणीच्या २० फेरी पुर्ण होईपर्यत ही आघाडी कायम ठेवली. रासने यांना ६१ हजार ७७१ मते तर धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळली.
तीस वर्षानंतर इतिहास घडला
पुण्याचा कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला आहे. लढत चुरशीची होतीच, पण ११ हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. १९९१ ची पोटनिवडणूक वगळता भाजपचेच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गिरीश बापट पाच वेळा इथे आमदार होते. त्यांनतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या.