“५४ कोटी खर्चूनही परांडे नगर पाण्यात; प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

Date:

वडगावशेरीतील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश

५४ कोटींच्या ‘स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट’ प्रकल्पाची चौकशी करण्याच्या सूचना

पुणे, दि. १४ जुलै : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विविध भागांत पावसाचे पाणी साचणे, पावसाळी वाहिन्यांची अपूर्ण कामे आणि पावसामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या समस्यांबाबत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनासोबत बाधित भागांची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

मात्र, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात एकूण किती किलोमीटर पावसाळी वाहिन्या अर्थात ‘स्टॉर्म वॉटर लाईन्स’ आहेत, त्या नेमक्या कुठे जोडण्यात आल्या आहेत, तसेच परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांची लांबी किती असून त्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना जोडण्यात आल्या आहेत का, याबाबतची ठोस माहिती पाहणीदरम्यान समोर आली नाही.

रस्ते विभागाच्या अर्थसंकल्पात पावसाळी वाहिन्यांसाठी स्वतंत्र तरतूद असताना, पावसाळी वाहिनी आणि मलनिस्सारण वाहिनी यातील फरकाबाबत प्रशासनाकडून नागरिकांना स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचेही यावेळी निदर्शनास आले. दोन्ही प्रकारच्या वाहिन्यांचा एकाच अर्थाने उल्लेख करून दिशाभूल केली जात असल्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अग्रेसर शाळा परिसर, कॉमर्झोन, खेसे पार्क, कलवड, एस्टर्लिया सोसायटी, एलिमेंटो सोसायटी, पोरवाल रोड, लोहगाव आणि धानोरी परिसरातील पाणी साचणारी ठिकाणे, पावसाळी वाहिन्यांची कामे तसेच बाधित भागांची तपासणी करण्यात आली.

पाहणीप्रसंगी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प व ड्रेनेज) गोजारे, नगरसेवक रवी टिंगरे, हरिभक्त तसेच पुणे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, पावसाचे पाणी साचू नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि कामांचा दर्जा कायम राखावा, अशा सूचना देण्यात आल्या.

धानोरीतील सदोष कामांची तातडीने दुरुस्ती करा

धानोरी परिसरातील काही कामे सदोष पद्धतीने करण्यात आल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. या कामांची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदारांना सदोष कामांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.

निर्धारित तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करावे आणि कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट करण्यात आले.

परांडे नगरमधील पाणी साचण्याचा प्रश्न कायम

विश्रांतवाडी–धानोरी मुख्य रस्त्यावरील परांडे नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.

सन २०२२ मध्ये ‘स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट’अंतर्गत सुमारे ५४ कोटी रुपये खर्च करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच विकासकामांवर सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – गोपाळदादा तिवारी

एमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!आंदोलना...

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगला IPO साठी सेबीची मंजुरी

12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण,...

२२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे | पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापौर मंजुषा नागपुरे...

पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल

२०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेजची मागणी; पूरग्रस्त मूर्तिकारांना तातडीने...