पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष-उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

Date:

दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच

पुणे, दि. ९: संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.

या हिरकणीकक्षाअंतर्गत २ वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरामध्ये राजगिरा, शेंगदाणा, मुरमुऱ्याचे लाडु फुटाणे, फळे, बिस्किट, ओरआरएस, ग्लुकॉन डी, खाऊ ठेवण्यासाठी बरण्या, कागदी डिश आदी, खेळणी संचामध्ये बॅट बॉल. खुळखुळा. बाहुली. मोठा बॉल व लहान मुलांची इतर आवश्यक खेळणी आदी, गरोदर व स्तनदा मातांना अल्हाददायी वातावरणासाठी बेड, गाद्या, बेडशीट. उश्या. उशीचे कव्हर, पार्टिशन साठी मोठे पडदे आणि नॅपकीन, प्रथमोपचार पेटी , पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व सॅनेटरी पॅड या सुविधा आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांना हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खंडागळे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“गणेशोत्सवात DJ कशाला? पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्या” — पुनीत बालन

DJ नको; सांस्कृतिक आणि पारंपरिक वाद्यांनीच गणेशोत्सव साजरा झाला...

पुणेकरांनो, पाणी भरून ठेवा! गुरुवारी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

पुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमध्ये विद्युतविषयक तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची...

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...