अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षा उपाययोजनांचे निर्देश

Date:

सुरक्षा साधने, कामगारांसाठी सुरक्षित निवास आणि ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; दुर्घटना झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार

पुणे | प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे बांधकामस्थळी जमीन खचणे, संरक्षक भिंती कोसळणे तसेच इतर दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि नियोक्त्यांना आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सर्व बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि नियोक्त्यांनी ims.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नियोक्ता म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी. बांधकामस्थळी कार्यरत कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, बूट आणि अन्य आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणे उपलब्ध करून सुरक्षित कामकाजाची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगारांच्या निवासाची पाहणी करण्याचे निर्देश

अतिवृष्टीच्या काळात जमीन खचणे, संरक्षक भिंती कोसळणे किंवा पाणी साचणे यांसारख्या घटनांचा धोका लक्षात घेऊन कामगारांच्या निवासस्थानांची पाहणी करावी. निवासस्थानी कोणताही धोका नसल्याची खातरजमा करून आवश्यकता असल्यास कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.

कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्राथमिक उपचार आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अनोंदणीकृत कामगारांची तातडीने नोंदणी करा

बांधकामस्थळी कार्यरत अनोंदणीकृत कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तातडीने नोंदणी करावी. संबंधित कामगारांना शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक योजनांसह सुरक्षा संच, अत्यावश्यक संच आणि वैद्यकीय तपासणीचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बांधकाम कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भातील १३ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

दुर्घटना झाल्यास व्यावसायिक आणि कंत्राटदार जबाबदार

सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बांधकामस्थळी अपघात किंवा मनुष्यहानी झाल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार अथवा नियोक्त्यालाच पूर्णपणे जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

पुणे, दि. ९: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा...

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष-उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच पुणे,...

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू

पुणे , दि. ९ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या...

मुख्यमंत्र्यांच्या ‘देख लुंगा’ भाषेवर विरोधक आक्रमक; फडणवीसांवर चौफेर टीका

‘मिसिंग लिंक’वरील प्रश्नांना धमकीच्या भाषेत उत्तर देणे योग्य नाही;...