लोणावळा घाटात दरड कोसळल्याने 14 रेल्वे रद्द

Date:

मुंबई, पुण्यासह नांदेड, सोलापूर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय
पुणे-लोणावळा – कर्जत रेल्वे घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. मध्य रेल्वेने मंगळवारी एकूण १४ गाड्या रद्द केल्या तर एक गाडी अंशतः रद्द करुन ५ गाड्यांचे मार्ग वळवले. तीन गाड्या शॉर्ट टर्मिनेट, तीन गाड्या शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या असून एका गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, धुळे, नांदेड, सोलापूर तसेच दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम दिसून आला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले असून घाट विभागातील दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, हुबळी-दादर एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या पुणे येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या. तर दादर-हुबळी एक्स्प्रेस, सीएसएमटी-सिकंदराबाद एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस या पुणे येथूनच शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या.
पुणे-भुज एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर इंटरसिटी, सोलापूर-पुणे इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, तसेच धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्स्प्रेसचा रद्द आहे.

धुळे एक्स्प्रेस रद्द, गीतांजली पाऊण तासाच्या उशिराने

मनमाडकडून येणाऱ्या रेल्वे गाड्या वेळेवर आहेत . मुंबईहुन येणाऱ्या गाड्या ४० मिनिटे उशिरा धावत आहेत. धुळे एक्स्प्रेस रद्द, तर मुंबईहून येणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसचे इंजिन आसनगाव येथे फेल झाले आहे. त्यामुळे गीतांजली एक्स्प्रेस तब्बल पाऊण तास उशिरा धावत आहे.

चंदनपुरी घाटात वाहनांच्या रांगा, श्रीगोंद्यात रस्ता बंद

पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात मंगळवारी दुपारी पावसामुळे दरड त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. भीमा नदीत १ लाख ५६ हजार १८७ क्युसेकने विसर्ग केल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज ते आर्वी बेट हा रस्ता बंद झाला.

मध्य रेल्वेकडून ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा

कर्जत-लोणावळादरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर, मध्य रेल्वेने प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्व विभागांमध्ये जलद आणि विनासायास परतावा वितरित केला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ६ जुलै रोजी ७९,७४७ प्रवाशांना तब्बल ५.९१ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ९६% जास्त आहे. यात मुंबई विभागात सर्वाधिक ३७,३३० प्रवाशांना २.८६ कोटी, तर पुणे विभागात २०,९८२ प्रवाशांना १.५६ कोटी रुपयांचा परतावा मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण परतावा मिळालेल्या प्रवाशांच्या संख्येत १०६% वाढ झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

36 तासांत 18 इंच पाऊस, अर्धे सुरत बुडाले

गुरुग्राममध्ये 10km वाहतूक कोंडी, राजस्थानमध्ये 3 लोकांवर वीज कोसळली;...

भीमा खोऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग…प्रमुख धरणांची सकाळी ८ वाजताची स्थिती पहा

पुणे | प्रतिनिधी भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख...

मध्यरात्रीनंतर खडकवासला धरणाच्या विसर्गात सातत्याने वाढ; सकाळी ५.३० पासून २७,२०३ क्युसेक्स

अवघ्या साडेपाच तासांत विसर्ग ८४२ क्युसेक्सवरून २७ हजार २०३...