मुंबई–पुणे मिसिंग लिंकवर मलबा हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

पुणे , दि. ६ जुलै : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक नसल्यास मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दरड कोसळलेल्या ठिकाणी सुमारे १०० टन मलबा साचला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारची दरड न कोसळलेल्या भागात ही घटना घडली आहे. आतापर्यंत सुमारे ७० टन मलबा हटविण्यात यश आले असून उर्वरित मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एकाच लेनमधून वाहतूक सुरू असून, पुढील दीड तासात आणखी मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी उपस्थित असून, संबंधित विभाग, यंत्रणा आणि आपत्कालीन पथके समन्वयाने काम करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच प्रवास करण्याचे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादी कॉँग्रेसची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी बरखास्त

निरीक्षक सुनील माने यांच्याकडे प्रभार पिंपरी दि ६ : राष्ट्रवादी...

पूरपरिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागांतील वीजपुरवठा बंद

महावितरणचे वीजग्राहकांना सतर्कतेचे व सहकार्याचे आवाहन पुणे, दि. ६ जुलै,...