पूरपरिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागांतील वीजपुरवठा बंद

Date:

महावितरणचे वीजग्राहकांना सतर्कतेचे व सहकार्याचे आवाहन

पुणे, दि. ६ जुलै, २०२६: पुणे व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध विभागांतील वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वीज यंत्रणेत पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरु करण्यात येईल असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

विभागनिहाय सद्यस्थिती खालीलप्रमाणे:
राजगुरुनगर विभाग:
राजगुरुनगर विभागात सुरक्षेच्या कारणास्तव एकूण ५६९ रोहित्रांचा (Transformers) वीजपुरवठा बंद करावा लागला. यामध्ये चाकण शहरातील २ फिडर बंद असल्याने ३३९ रोहित्र बंद होते. मात्र सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास या दोन्ही फिडरचा वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. याशिवाय राजगुरुनगर उपविभागात ५, चाकण एमआयडीसीत १०१, वडगाव मावळमध्ये ३९, लोणावळ्यात ६८ आणि तळेगाव येथे १८ रोहित्रे सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, आंबेठाण गावाजवळील इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यासाठी ‘एनडीआरएफ’ (NDRF) पथकाच्या विनंतीवरून सकाळी ११:४० वाजल्यापासून ३३ केव्ही ह्युंडाई, ३३ केव्ही कॉर्निंग आणि २२ केव्ही आंबेठाण फिडर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता.
भोसरी विभाग:
देहूगाव येथील सोसायट्यांमध्ये पाणी साचल्यामुळे मुख्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार २२ केव्ही देहूगाव फीडर बंद ठेवण्यात आला आहे. तसेच एफए (FA) स्विचिंग स्टेशन, सेक्टर २४ स्विचिंग आणि ईडब्ल्यूएस (EWS) स्विचिंग स्टेशनमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याची पातळी आतील यंत्रणेपर्यंत पोहोचल्यामुळे सुरक्षेसाठी या केंद्रांमधून बाहेर जाणारा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
नगररोड विभाग:
विश्रांतवाडी शाखेतील इंदिरानगर भागात पाणी भरल्यामुळे १ रोहित्र बंद करावे लागले आहे. यासोबतच शांतीनगर आणि चव्हाण चाळ भागात पुराचे पाणी शिरल्याने येथील ३ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पिंपरी विभाग:
२२ केव्ही म्हाडा फिडरचे आरएमयू (RMU) पाण्यात बुडाल्याने घनश्याम स्विचिंगचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. भोंडवे कॉर्नर येथे पाणी साचल्याने २२ केव्ही बीए फिडर आणि २२ केव्ही अक्षरलँड फिडरच्या आरएमयूमध्ये पाणी शिरले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून २२/११ केव्ही बीए सबस्टेशनचा वीजपुरवठा पुनावळे फिडरवरून सुरू करण्यात आला आहे, तर अक्षरलँड सबस्टेशनचा पुरवठा तथावडे फिडरवरून देण्याचे काम सुरू आहे. तसेच, एम्पायर सोसायटीच्या पॅनल रूममध्ये दुपारी १:३० वाजता पाणी शिरल्यामुळे २२ केव्ही एम्पायर फेज १ फीडर ‘हँड ट्रिप’ करून सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

महावितरणचे नागरिकांना आवाहन-

पावसाची आणि पुराची भीषण परिस्थिति पाहता जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वीज यंत्रणेच्या आसपास पाणी साचले असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही उपकरणाला हात लावू नये. महावितरणची टीम परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अविरत काम करत आहे. तरी सर्व वीजग्राहकांनी विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, संयम बाळगावा आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण पुणे परिमंडलातर्फे करण्यात आले आहे.
विजेच्या तक्रारींसाठी महावितरणच्या खालील टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा:
• 1912
• 1800-212-3435
• 1800-233-3435

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादी कॉँग्रेसची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी बरखास्त

निरीक्षक सुनील माने यांच्याकडे प्रभार पिंपरी दि ६ : राष्ट्रवादी...