पुण्यात ईव्हीएम गोदाम, मतदान केंद्र व एसआयआर कामकाजाची प्रधान सचिवांकडून पाहणी

Date:

पुणे : भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव मा. व्ही. सी. पात्रा यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित विविध यंत्रणांची पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी रावेत येथील ईव्हीएम (EVM) गोदाम तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थापन, सुरक्षितता आणि कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यानंतर दुपारच्या सत्रात भारत निवडणूक आयोगाच्या एसआयआर (Special Intensive Revision) अंतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतदान नोंदणी कार्यालयाला भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला.

एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण, नवीन पात्र मतदारांची नोंदणी, विद्यमान मतदारांच्या माहितीतील दुरुस्ती, पत्त्यातील बदलांची नोंद, मृत अथवा अपात्र मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतींची माहिती प्रधान सचिवांना सादर करण्यात आली. याशिवाय पात्र मतदारांचा समावेश सुनिश्चित करणे, नोंदींची पडताळणी आणि नागरिकांना सुलभ व वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.

या पाहणीदरम्यान जिल्हा उपनिवडणूक अधिकारी मीनल कळसकर, हवेली प्रांत अधिकारी तथा खडकवासला विधानसभा निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सचिन आखाडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रक्रियांची माहिती सादर करत कामकाजाची सद्यस्थिती स्पष्ट केली.

यावेळी मा. पात्रा यांनी सर्व विभागांचे काम बारकाईने पाहून मतदार नोंदणी प्रक्रियेतील अचूकता, माहितीची काटेकोर पडताळणी, नोंदींचे वेळोवेळी अद्ययावतीकरण आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. नागरिककेंद्रित सेवा आणि कार्यक्षम नोंदणी व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी संबंधित विभागांच्या कामकाजाचे कौतुक केले तसेच आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...