पाच कोटींचा वेतन अपहार- मारुती नवले,सुनंदा नवले,रचन नवले,रोहित नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Date:

पुणे-सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध पाच कोटी सहा लाख रुपयांच्या वेतन अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ शिक्षकांच्या वेतनाचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. मारुती नवले यांच्यासह सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचन नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागाचे संजय मोरे आणि शरद जराड यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदार शिक्षिका सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये कार्यरत आहेत. एप्रिल २०२० पासून संस्थेने त्यांचे वेतन अदा केले नव्हते. गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांचे १९ लाख ३६ हजार रुपयांचे वेतन थकीत होते. त्यांच्यासह एकूण २७ शिक्षकांचे वेतन थकवण्यात आले होते.

शिक्षकांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी फसवणूक आणि अपहाराच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या तक्रारीनंतर मारुती नवले यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पात्र मतदारांची अचूक नोंदणी व निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे-मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision -...

विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू,औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी...

पुण्यातील सात हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

पुणे, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाने...