पुणे, दि. 3 : नागरी संरक्षण संचालनालयाच्या प्रादेशिक नियंत्रण कक्षातील उपनियंत्रक अधिकारी (गट-क) आणि बिनतारी यंत्र चालक (गट-क) पदे भरण्यात येणार असून, या पदांसाठी पात्र माजी सैनिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
उपनियंत्रक अधिकारी पदासाठी पदवी, रेडिओ टेलिफोनी, टेलिफोन स्विचबोर्ड संचालन, सिग्नल प्रशिक्षण किंवा नागरी संरक्षण नियंत्रण व दळणवळण विषयातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण आवश्यक आहे. बिनतारी यंत्र चालक पदासाठी एसएससी, वायरलेस ऑपरेटरचा अभ्यासक्रम, वायरलेस टेलिफोनी प्रमाणपत्र किंवा समकक्ष प्रशिक्षण तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यात नोंदणीकृत व निर्धारित पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक माजी सैनिकांनी दि. ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मेजर शिल्पा मारोती खरपकर (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
0000

