महापालिकेच्या सर्वप्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात

Date:

बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

पुणे, दि. २ जुलै : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली बनावट लेटरपॅड, शिक्के, लोगो आणि नियुक्तीपत्रांचा वापर करून बेरोजगार तरुण-तरुणींची फसवणूक झाल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून संपूर्ण भरती प्रक्रियेचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे. तसेच महापालिकेतील सर्व प्रकारच्या भरतीसाठी एकच अधिकृत ऑनलाइन पोर्टलची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या नावाने सुपरवायझर व इतर पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये महापालिकेचा लोगो, बनावट लेटरपॅड, शिक्के आणि बनावट जॉईनिंग लेटरचा वापर करण्यात आल्याने महापालिकेच्या भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.

बैठकीत या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महापालिकेच्या नावाने काम करणाऱ्या सर्व कंत्राटी एजन्सी, त्यांचे करार, संपर्क तपशील आणि अधिकृत भरती प्रक्रिया सार्वजनिक करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक नियुक्तीपत्रावर क्यूआर कोड किंवा युनिक व्हेरिफिकेशन नंबर देण्याची प्रणाली विकसित करण्याचेही निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या सर्व कंत्राटी आणि इतर भरती प्रक्रियेचे विशेष लेखापरीक्षण करून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कायमस्वरूपी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रकारच्या भरतीसाठी एकच अधिकृत ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्जापासून नियुक्तीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पडताळणीयोग्य स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

याशिवाय, महापालिकेच्या नावाने कोणत्याही एजन्सीमार्फत उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधित एजन्सीला तात्काळ काळ्या यादीत टाकणे, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल ओळख प्रणाली सुरू करणे, तसेच “महापालिकेत नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नका” अशी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

मैलापाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन डायऑक्साइड पावडर खरेदीस १.०२ कोटींची मंजुरी

शहरातील नऊ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या क्लोरीन डायऑक्साइड पावडरच्या पुरवठ्यासाठी सुमारे १.०२ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीने मंजुरी दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील नऊ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची एकूण क्षमता ४७७ एमएलडी इतकी आहे. या केंद्रांमध्ये सांडपाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन डायऑक्साइड पावडरचा नियमित वापर केला जातो. त्यासाठी ९७.३५ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. या कामासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ‘मैलापाणी शुद्धीकरणासाठी लागणारी रासायनिक द्रव्ये’ या शीर्षकाखाली ३.४५ कोटी रुपयांची तरतूद आहे.

या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्यानंतर दोन पात्र निविदा प्राप्त झाल्या. प्रारंभी दोन्ही कंपन्यांनी अंदाजित किमतीपेक्षा सहा टक्के अधिक दराची निविदा सादर केली होती. त्यानंतर सुधारित दर मागविण्यात आले. गिरिराज ट्रेडिंग कंपनीने प्रथम पाच टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली. नंतर हा दर कमी करून ४.५ टक्के अधिक दराने काम करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे ८६ लाख २१ हजार २५० रुपयांची निविदा सर्वात कमी ठरली.

जीएसटीसह या कामाची एकूण किंमत १ कोटी १ लाख ७३ हजार ७५ रुपये इतकी होणार आहे. निविदा समितीनेही सुधारित दरास मान्यता दिली असून हे दर बाजारभावाशी सुसंगत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर कार्यादेश देऊन करारनामा करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सर्व मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांना आवश्यकतेनुसार क्लोरीन डायऑक्साइड पावडरचा अखंड पुरवठा सुनिश्चित होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची...

पात्र मतदारांची अचूक नोंदणी व निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे-मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision -...