मुंबई |
रॉकिंग स्टार यश अभिनित बहुचर्चित ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटातील ‘लेडीज अँड लेडीज’ हा विशेष व्हिडिओ प्रदर्शित झाला असून, चित्रपटातील दमदार महिला पात्रांची प्रभावी झलक त्यातून पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या प्रभावी व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या आहेत. सत्ता, रहस्य, बंडखोरी आणि आत्मविश्वास यांचा संगम असलेले हे पात्र चित्रपटाच्या कथानकाला वेगळी उंची देणार असल्याचे दिसते.
व्हिडिओची सुरुवातच एका हटके इशाऱ्याने होते. त्यानंतर चित्रपटाच्या गूढ आणि स्टायलिश विश्वाची ओळख करून देत प्रत्येक अभिनेत्रीची प्रभावी उपस्थिती दाखवण्यात आली आहे. यामुळे ‘टॉक्सिक’मधील महिला पात्रे केवळ सहाय्यक नसून कथानकाचा केंद्रबिंदू असतील, हे स्पष्ट होते.
गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत असून, नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स निर्मित हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

