पुणे, दि. २८ जून २०२६ :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या उद्देशाने , वडगाव बुद्रुक, पुणे येथे महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे हा होता.
कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, नवीन दप्तर घेतानाची उत्सुकता आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हे या उपक्रमाचे खरे यश ठरले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी श्री. हेमंत दादा दांगट, श्री. अविनाश चरवड, श्री. अप्पा येवले, श्री. युवराज जाधव, श्री. बापू पासलकर, श्री. संजय पवळे, श्री. शहाजी वांजळे, श्री. सचिन गायकवाड, श्री. स्वप्नील वाघ, श्री. सचिन वांजळे तसेच वडगाव परिसरातील ग्रामस्थ व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

