देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ

Date:

काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे संपन्न.

मुंबई

देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे. रा. स्व. संघ व भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवायचे आहे. मागील १२ वर्षापासून संविधान व लोकशाही पायदळी तुडवली जात आहे आणि याविरोधात आपल्याला खंबीरपणे लढायचे आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर, अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला १०० वर्षे झाली तरी अद्याप या संघटनेची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही, आणि जी संघटना समाजात विष कालवते, त्या संघटनेचे गुणगान एक आयपीएस अधिकारी गातो, त्या संघटनेला चांगली संघटना म्हणतो, हे अत्यंत गंभीर आहे. देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन करत हर्षवर्धन सपकाळ यांनी अनिरुद्ध वनकर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना अनिरुद्ध वनकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा दिला होता, तो संविधान संपवण्यासाठी होता. भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाला देशात मनुवाद आणायचा आहे, भाजपा संघाचा हा कुटील डाव लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओळखला आणि हातात संविधान घेऊन लोकसभा निवडणुकीत देशभर रान पेटवले व भाजपाचा डाव हाणून पाडला पण हा धोका संपलेला नाही. देशाचे संविधान धोक्यात आहे हे ओळखून काम करा, एसआयआर मधून दलित, अल्पसंख्याक समाजाची नावे वगळली जात आहेत, त्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही वनकर यांनी केले.
अनुसुचित जाती विभागाचे माजी चेअरमन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनाही यावेळी मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....

पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्ज मुक्त; ७० अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा!

'पीएमआरडीए'ची धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार! पुणे :...

वाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे "अब नॉर्मल" दिव्यांग केंद्राला आवश्यक साहित्य...