वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंनी थेट जैनांच्या प्रतिनिधींना सुनावले

Date:

जिरेटोप प्रकरणी मराठीत माफीनामा-कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता?-आमची डोकी भडकली तर केवढं होईल…

मुंबई-मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिला आहे.

मालाडमध्ये घडलेल्या घटनेत छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि मनसैनिकांमध्ये तीव्र संताप होता. याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी जैन समाजाच्या व्यापाऱ्यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली आणि आपली चूक मान्य करत त्यांना मराठी भाषेत माफीनामा लिहून दिला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर, गिरगाव आणि इतर भागांतील सोसायट्यांमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रस्त्यांवर आणि सोसायटीच्या आवारात पांढरे पट्टे मारण्याचा ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी जैन समाजाला सुनावले की, “गेल्या १०-१२ वर्षांतच असे वाद कसे सुरू झाले? याआधी तुमचे धर्मगुरू सोसायट्यांमध्ये यायचे नाहीत का? तेव्हा असे पांढरे पट्टे मारले जात नव्हते. तुमचे धर्मगुरू येणार असतील तर तुम्ही कार्पेट किंवा कापड टाका आणि ते गेल्यावर ते काढून घ्या. पण असे पांढरे पट्टे कसले मारता?”.

राज ठाकरे यांनी जैन समाजाला स्पष्ट शब्दांत राजकीय भान राखण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “तुमची माथी भडकवली जात आहेत. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्या अंगावर येऊ नका. तुम्हाला काय वाटतं, वर दोन गुजराती बसले आहेत तर तुम्ही काहीही करू शकता का?” असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला.

महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्याच्या प्रकरणावरून हे शिष्टमंडळ दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आले होते. मात्र, राज ठाकरेंनी त्यांना भविष्यासाठी सज्जड दम दिला. “तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा. तुम्ही पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. जर तुम्ही अति करत असाल आणि आमची डोकी भडकली, तर केवढं होईल याचा विचार करा,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

यापूर्वी संदीप देशपांडे आणि इतर मनसे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अनेक ठिकाणचे पांढरे पट्टे हटवण्यात आले होते. आता राज ठाकरे यांनी जैन व्यापारी वर्गाला स्पष्ट आणि कडक इशारा दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....

पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्ज मुक्त; ७० अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा!

'पीएमआरडीए'ची धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार! पुणे :...

वाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे "अब नॉर्मल" दिव्यांग केंद्राला आवश्यक साहित्य...