‘देवाभाऊ टॅक्सी’- प्रवीण दरेकरांचा नवा घोटाळा?,मनी लाँड्रिंगसाठी ‘शेल’ संस्थेचा वापर: पत्रकार परिषदेत अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Date:


मुंबई- विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या ‘देवाभाऊ टॅक्सी’ योजनेमागे मोठा भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग असल्याचा दावा दमानिया यांनी केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उदात्तीकरण करण्यासाठी सामान्य लोकांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था मर्यादित’ ही एक बोगस (Shell) संस्था आहे. ही संस्था 4 डिसेंबर 2001 रोजी स्थापन झाली, पण गेल्या 25 वर्षांत त्यांच्याकडे एकही गाडी नाही, कोणतीही उलाढाल नाही किंवा त्यांनी कधीही संस्थेची निवडणूक घेतलेली नाही. “2018 मध्ये निवडणूक का घेतली नाही?” या प्रश्नावर संस्थेने, ‘2018 साली कोविडमुळे लॉकडाऊन होता’ असे खोटे आणि हास्यास्पद कारण लेखी स्वरूपात दिल्याचे दमानिया यांनी उघड केले. या संस्थेतील 28 सदस्यांच्या सह्या बोगस असल्याचा संशय आहे. एकाच व्यक्तीची 2001 मधील सही मराठीत आणि 2013 मधील सही स्टायलिश इंग्रजीत असल्याचे त्यांनी समोर आणले. ही संस्था ‘क’ श्रेणीमध्ये मोडते आणि 2023-24 मध्ये तिचा निव्वळ नफा फक्त 941 रुपये होता.

संस्थेची आर्थिक स्थिती इतकी बिकट असताना आणि त्यांच्या मुंबई बँकेतील खात्यात सध्या शून्य रुपये शिल्लक असताना, प्रवीण दरेकर यांनी या संस्थेला मुंबई बँकेकडून 2 हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा केली आहे. “हा पैसा सामान्य कष्टकरी लोकांचा आणि सहकारी संस्थांचा असून तो या बोगस संस्थेसाठी वापरला जात आहे,” असा आरोप दमानिया यांनी केला.

केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ योजना सुरू केली असून, महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणे गरजेचे होते. मात्र, अमित शहांची ‘भारत टॅक्सी’ डावलून या योजनेला देवेंद्र फडणवीस यांचे ‘देवाभाऊ टॅक्सी’ असे नाव देण्यात आले आहे. “देवेंद्र फडणवीस यांचे उदात्तीकरण करण्यासाठी आणि सरकारी कामात कुठेही अडवणूक होऊ नये म्हणून हे नाव दिले गेले आहे. ओला-उबरला पर्याय म्हणून टॅक्सी सेवा येणे गरजेचे आहे, पण त्याला ‘सामान्यांची टॅक्सी’ किंवा ‘महाराष्ट्र टॅक्सी’ असे नाव द्यावे, ‘देवाभाऊ टॅक्सी’ हे नाव आम्हाला मान्य नाही,” असे दमानिया म्हणाल्या.

पोलीस स्टेशनच्या भूखंडावर ‘सहकार भवन’?

याच बोगस संस्थेने सुरुवातीला गोरेगाव येथील माफकोची 3 एकर जमीन ‘सहकार भवन’ उभारण्यासाठी मागितली होती. मात्र, आता त्याऐवजी सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये पोलीस स्टेशनसाठी आरक्षित असलेला एक मोठा भूखंड त्यांना देण्यात आला असून त्याचे उद्घाटनही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. “राजकीय पदाचा आणि देवेंद्र फडणवीसांशी असलेल्या जवळीकीचा गैरवापर करून जमिनी लाटण्याचा आणि स्वतःचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे,” असा आरोप दमानिया यांनी केला.दमानिया यांनी सहकार आयुक्तांकडे या संस्थेच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, खोट्या सह्या आणि बोगस व्यवहारामुळे ही संस्था तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणि पुरावे त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पुणे सहकार आयुक्तांना पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “देवेंद्र फडणवीस यांनी अशा चुगलीखोर आणि लुटारू नेत्यांना बाजूला करून थोडं तरी शुद्धीवर यावे,” असा सल्लाही त्यांनी अखेरीस दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा...

वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंनी थेट जैनांच्या प्रतिनिधींना सुनावले

जिरेटोप प्रकरणी मराठीत माफीनामा-कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता?-आमची...

‘मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल’:अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप

आता भाजपमध्ये मराठा-ब्राह्मण वाद? पुणे-'सारथी' संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री...