मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा मेघराज राजेभोसले,खजिनदारपदावर सुनील महाजन

Date:

  • नूतन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत सर्व जागांवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी रागिणी खडके,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.

याच बैठकीत महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारी संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष (कोल्हापूर) धनाजी यमकर, उपाध्यक्ष (मुंबई) आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील आणि सहखजिनदार शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली.

बैठकीस राज काझी, अजित शिरोळे, सुभाष नकाशे, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर ,रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला होता. या निकालानंतर अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांचे नाव पुढे आले आणि संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांच्यावर एकमताने विश्वास व्यक्त केला.

निवडीनंतर बोलताना मेघराज राजेभोसले यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांना एकत्र घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न सोडविणे, उद्योगाला चालना देणे, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांना संधी उपलब्ध करून देणे तसेच चित्रपट, दूरदर्शन, नाट्य आणि ओटीटी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी सदस्यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व घटकांना सोबत घेऊन उद्योगाच्या प्रगतीसाठी, कलाकार-तंत्रज्ञांच्या हितासाठी आणि मराठी चित्रपटांच्या व्यापक प्रसारासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले असून, आगामी काळात महामंडळाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्ष उभारणार

पुणे- श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम...

१५ जूनलाही महापालिकेची पावसाळापूर्व कामे सुरूच ..

पुणे-पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणी साठण्याच्या 250 ठिकाणांपैकी 120 ठिकाणी तातडीने...

महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

सेवा मित्र मंडळातर्फे शाळेचा पहिला दिवस ; पारंपरिक पद्धतीने...