पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ कामे करा:विभागीय आयुक्त

Date:

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. 11: पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे महानगर प्रदेशातील भविष्यातील वाहतुकीचे एकात्मिक नियोजनाच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजनांच्या प्रकल्पांवर काम करत असतानाच सध्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या तात्काळ हाती घेता येतील अशा उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश श्रीमती तेली- उगले यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., पुणे मनपा अपर आयुक्त पवनीत कौर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, पुणे शहरात प्रस्तावित बोगदांचे जाळे अर्थात ‘पाताल लोक प्रकल्प’, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत वर्तुळाकार मार्ग आदी दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी जाणार आहे. या प्रकल्पांचे नियोजन, आरेखन, विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याला गती द्यावी.

दीर्घकालीन प्रकल्पांचा कालावधी पाहता सध्या अस्तिवात असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा तसेच क्षमतावाढ व्हावी यासाठी महानगरपालिका, पोलीस, रेल्वे, महामेट्रो, पीएमपीएमएल, एसटी, परिवहन विभाग या विभागांची उपसमिती स्थापन करून विचार विनिमय करावा व त्याबाबतचे सादरीकरण प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मेट्रो, रेल्वे आदी सेवांचा पूर्ण वापर व्हावा यासाठी शेवटच्या ठिकाणाहून त्यांच्या इच्छित स्थानी जाण्यासाठी प्रवाशांना जोडणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीएमल बसेस, रिक्षा थांबे यांची सुविधा त्या त्या ठिकाणी झाली पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

बोगद्यांचे नियोजन करताना त्यात मर्यादीत वाहनांचा समावेश न करता सार्वजनिक वाहतूक वाहनांना प्रवेश मिळाल्यास वाहतूक गतीने होईल, असे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा समावेश प्राधान्याने प्रकल्पांमध्ये करण्यात यावा. दोन्ही महानगरपालिका तसेच महानगर प्रदेश क्षेत्रात वाहतूक एकात्मिक पद्धतीने गतीमान होईल यासाठी समन्वयाने प्रकल्पांची आखणी व्हावी, असे श्री. चौधरी म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी वाहतूक विभागाबाबत सादरीकरण केले. सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्याकडील सांख्यिकी माहिती (डेटा) एकमेकांना दिल्यास योग्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने काम होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्टेशन येथे नवीन 6 रेल्वे फलाट करण्यासह अस्तित्वात असलेल्या 6 फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्यावतीने सादरीकरणात देण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगररचना, वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी, मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा पकडला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक...

भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी नाही

नवी दिल्‍ली नेपाळमध्ये भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे...

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त

ठाणे-ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज...

AAIB चा अहवाल न आल्याने रोहित पवार भडकले,म्हणाले,’वाट पाहा म्हणणारे सत्तेचे दलाल, नमकहराम आणि कृतघ्न लोक…

अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या म्हणणाऱ्यांवर घणाघात" अहमदाबाद विमान...