राहुरीच्या तनपुरेंकडे पुण्यात 4 कोटींचे दोन फ्लॅट्स

Date:

मुंबई-अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची संपत्ती १ कोटीने वाढली असून उत्पन्न घटल्याचे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये इतके आहे. यामध्ये पुण्यातील विमाननगर (लोहगाव) सारख्या उच्चभ्रू भागात असलेल्या प्रत्येकी १७५० चौरस फुटांच्या दोन आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. या दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित खरेदी किंमत ४ कोटी १९ लाख रुपये आहे.

जंगम मालमत्ता: शेअर्स आणि बँकेतील ठेवींचा मोठा भरणा

प्राजक्त तनपुरे यांच्याकडे २ कोटी ३६ लाख १७ हजार ८६९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांची पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नावावर १ कोटी ७३ लाख ३५ हजार ३२५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. २०२४ मध्ये १ कोटी ३१ लाख ९२ हजार होती.
वार्षिक उत्पन्न आणि कर्जाचा डोंगर

वार्षिक उत्पन्न : तनपुरे यांचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख ६८ हजार १३० रुपये इतके आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ४१,१३० रुपये नोंदवले गेले आहे. २०२४ मध्ये वार्षिक उत्पन्न ४६ लाख ८२३० इतके होते. तनपुरे यांच्यावर ४ कोटी ६२ लाख ३५ हजार ६०२ रुपयांचे कर्ज आहे.

सोने-चांदी : तनपुरे दांपत्याकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोने असून, त्याची चालू बाजार किंमत प्रत्येकी १२ लाख रुपये दर्शवण्यात आली आहे. सोनाली यांच्याकडे आणखी १० लाख रुपयांची ज्वेलरी आहे.

कंपन्यांमध्ये गुंतवणूक: ‘प्राजक्त टेक्स्टाईल प्रा. लि.’ मध्ये ४८.१८ लाख व ‘प्रसाद शुगर अँड ॲलाइड ॲग्रो प्रॉडक्ट्स’ मध्ये ४४.६३ लाख.

बँक खात्यांमधील ठेवी: स्टेट बँक ऑफ इंडिया (राहुरी शाखा) खात्यात सर्वाधिक ८१ लाख २९ हजार ९९१ रुपये जमा आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेकायदा होर्डींग्ज वर जोरदार कारवाई सुरु:लोणकर चौकातील ७ होर्डींग्ज हटविले

पुणे- महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने बेकायदा होर्डींग्ज वर जोरदार...

स्टेंट निष्प्रभ ठरल्यास लेझर ठरते जीवनदायी: प्रगत कार्डिअॅक उपचारांद्वारे रुग्णांना मिळते आयुष्याची दुसरी संधी

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे प्रगत कार्डिअॅक लेझर...

महामंडळातील गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार हटवा-अभिनेत्री भाग्यश्री देसाईंचे आवाहन

पुणे(अभिषेक लोणकर)- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीच्या...

लोकेश चंद्र यांना महा आयकॉन पुरस्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान मुंबई मुख्यमंत्र्यांचे अपर...