पुणे- महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने बेकायदा होर्डींग्ज वर जोरदार कारवाई सुरु केली आहे. काल केशवनगर ,मुंढवा येथील लोणकर चौक , शरद नगर येथील ७ बेकायदा होर्डींग्ज महापालिकेने हटविले . हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई महापालिका उपायुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत अधीक्षक महेश निम्हण यांच्या नेतृत्वाखाली विजय धनवाल, योगेश काकडे, विनोद लांडगे, कुणाल कांबळे आणि स्वप्नील रासकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत अनधिकृत फलक आणि होर्डिंग हटविण्याची कारवाई केली. यात २० बाय २० च्या ४ होर्डींग्ज चा समावेश आहे तर त्याहून मोठी ३ होर्डींग्ज होती. शहरात, उपनगरात जिथे जिथे बेकायदा होर्डींग्ज असतील ते शोधून तिथे तिथे जाऊन महापालिका त्यावर कारवाई करेल असे यांनी यावेळी म्हटले आहे.


