पुणे, २६ मेः इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये स्थापन केलेल्या सेंटर फॉर एक्सलेन्स इलेक्ट्रिक व्हेकल्सचे माध्यमातून इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधीत तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला परिपूर्ण करण्यासाठी संशोधन, विकास, कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जात आहे. तसेच टीबीआय सेंटर मध्ये३ यशस्वी स्टार्टअप, ४५ वेगवेगळ्या स्टार्टअप वर कार्य सुरू आहे. ज्यांना यशस्वीरित्या स्वतःचे स्टार्टअप सुरू करावयाचे आहे, त्यांच्यासाठी हे सेंटर सर्वतोपरी मदत करेल. अशी माहिती माईर्स एमआयटीचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलेन्स इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एमआयटी टीबीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद गोरे, ईअॅण्डटीसीच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ. पारुल जाधव व सहयोगी प्राध्यापक डॉ. साकेत येवलेकर उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून या सेंटरमध्ये कार्य केले जात आहे. शैक्षणिक ज्ञान आणि वेगाने विकसित होणार्या इलेक्ट्रिक वाहन उद्योग यांच्यातील दरी भरुन काढणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे. तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थामधील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि ईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता वाढवावी लागेल असे ही प्रा. जोशी यांनी सांगितली.
डॉ. पारुल जाधव म्हणाल्या, सेंटरच्या माध्यमातून प्रकल्प विकास, सहयोगी संशोधन, करिअर कौन्सिलिंग, विद्यार्थी आणि प्राध्यपकांचे प्रशिक्षण, उदयोगांशी सल्लामसलत, स्टार्टअप सहाय्य आणि ईव्ही क्षेत्रात संशोधन आणि विकासावर विशेष कार्य केले जात आहे. नव्या युगात आयसी इंजिनाबरोबरच इलेक्ट्रिक कार झपाट्याने वाढतांना दिसत आहेत. भविष्यात हायब्रीड व्हेइकल्स, इलेक्ट्रिक कार आणि हायड्रोजन कार असे अनेक पर्याय इलेक्ट्रिक कार मध्ये उपलब्ध होतील. लवकरच हे सेक्टर फार मोठा पल्ला गाठणार आहे. या सर्व उद्योगाला मदत करणारे एमआयटी डब्ल्यूपीयू येथील ई मोबिलिटी सेंटर फॉर एक्सलन्स हे आहे.
प्रसाद गोरे यांनी सांगितले की, या एमआयटी टीबीआय सेंटरच्या माध्यमातून जवळपास ७५ स्टार्टअपला सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच शिक्षण, कृषी, स्पेस, आयटी या क्षेत्राशी स्टार्टअप सुरू करण्याला मदत केली जाणार आहे. ज्यांना उद्योजक व्हावयाचे आहे त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. येथे लॅबटेस्टींग आणि तज्ज्ञ सल्लागार उपलब्ध आहेत.
डॉ. साकेत येवलेकर म्हणाले, उद्योग क्षेत्रातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि व्यावहारिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे, प्रशिक्षण सत्रे, कार्यशाळा, इंटर्नशिप, परिसंवाद आणि तज्ज्ञांचे व्याख्यान यांसारखे विशेष कार्यक्रमांद्वारे विद्यार्थी व उद्योग व्यावसायिकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील नाविन्यपूर्ण अद्ययावत ज्ञान व कौशल्ये प्रदान केली जात आहेत.
या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी आणि संशोधकांना नाविन्यपूर्ण एक प्रणाली शोधण्यास, डिझाइन करण्यास आणि विकसित करण्यास प्रोत्साहित केले जाते. इलेक्ट्रिक मोबिलिटी ही केवळ वाहतुकीची भविष्यातील दिशा नाही तर आजची गरज आहे.
इलेक्ट्रिक वाहन उद्योग, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी यशस्वी उपक्रम
Date:

